१ एप्रिल २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक ८ ते १३ / ज्ञानेश्वरी ओव्या ६४ ते ११० )
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं । तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी । तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु ।जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥
म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥
तेथ सुदशनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥
ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥

संजय उवाच ।
एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप । न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९॥

ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥
आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १०॥
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥
ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥
तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥
तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥

श्रीभगवानुवाच ।
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११॥

मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥
तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? । हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥
एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥
हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥
परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥
हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥
तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३॥
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
सारांश
ह्या आधीच्या श्लीकात अर्जुनाने उपदेश करायला सांगितले तरीही अजून त्याला काहीतरी सांगायचे आहे.
तो म्हणतो, मला इंद्राचे राज्य मिळाले तरी माझा मोह दूर होणार नाही. थोडावेळ मोह गेल्यामुळे उपदेश
करायला सांगितले पण परत तो सांगू लागला. भाजलेले बीज जरी चांगल्या जमिनीत पेरले आणि त्याला भरपूर
पाणी घातले तरी त्याला कोंब फुटत नाही, तसे माझा मोह जात नाही. मला उपदेश करा.
संजय म्हणाला
अर्जुनाने जेंव्हा मी युद्ध करणार नाही असे ठामपणे सांगितले तेंव्हा श्रीकृष्ण विचार करू लागले. असाध्य रोग
पाहून ज्याप्रमाणे वैद्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे श्रीकृष्ण रागाने बोलले. वरवर
कठोर परंतु आत हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले.
भगवान म्हणाले
तू हे जे काही आरंभिले आहेस ते आश्चर्यच आहे. तू स्वतःला जाणता म्हणवतोस पण अज्ञान टाकत नाहीस.
तुला शिकवावे म्हटले तर मोठ्या नीतीच्या गोष्टी सांगतोस. तू स्वतःला तर जाणत नाहीस पण कौरवाकरता शोक करतोस याचे मला आश्चर्य वाटते. तू मला हे सांग की तुझ्यामुळे त्रिभुवनाचे राज्य आहे का? जन्ममृत्यू तू उत्पन्न केलेस का? तू मारशील आणि ते मारतील असे तुला वाटते का? असे जर तुला वाटत असेल तर चुकीचे आहे. हे सगळे आपोआप होते असा क्रम अनादी काळापासून चालू आहे तर मग तू शोक का करतोस?
पण मूर्खपणामुळे तुला कळतच नाही. मनात आणू नये ते तू आणतोस आणि आम्हालाच नीतीच्या गोष्टी
सांगतोस. जन्म आणि मृत्यू हि केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते दोघांचाही शोक करत नाहीत.
जन्म आणि मृत्यू मायेमुळे अनुभवायला येतात, एरवी आत्मा अविनाशी आहे. शरीराच्या अनेक अवस्था असतात. प्रथम बालपण येते, नाहीसे होते. त्याप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला मोहरूपी दुःख कधीही होत नाही.

No comments:
Post a Comment