१ डिसेंबर २०१९ निरुपण
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक २२-२७ / ज्ञानेश्वरी ओव्या ३३२-४२२)
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च । गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२॥
हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे । अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी ॥ ३३२ ॥
अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व । जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥
हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं । हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती ॥ ३३४ ॥
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं ।करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥
ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट ॥ ३३६ ॥
तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी । म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥

रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम् । बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥ २३॥
जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें । जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥
हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे । याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥
ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें । बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा ॥ ३४० ॥
अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण । कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें ॥ ३४१ ॥
हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं । प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥
नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें । नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥
तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें । न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥
जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें । तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा ॥ ३४५ ॥
हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण । तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥
तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥ ३४८ ॥
एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥
तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण । केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती ॥ ३५० ॥
ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥
परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥ ३५२ ॥

नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४॥
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी किती{ए}कें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥ ३५३ ॥
गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥
तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी । कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा ॥ ३५६ ॥
कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला । विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी ॥ ३५७ ॥
हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें । तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा ॥ ३५८ ॥
परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ । आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥
नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं । तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥
तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु । विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं । तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे । तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥
आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे । हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले ॥ ३६४ ॥
ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज । तें नेणों परी मज । मरणभय आलें ॥ ३६५ ॥
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें । बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥
अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥
एर्हवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे । अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥
परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा । तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली ॥ ३६९ ॥
बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु । हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे ॥ ३७० ॥
देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं । तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥
तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें । हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया ॥ ३७२ ॥
जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा । परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ ॥ ३७३ ॥
ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं । जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥

दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि । दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५॥
पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें । तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें ॥ ३७५ ॥
असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं । सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा ॥ ३७६ ॥
जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें । कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥
तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे । आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी ॥ ३७८ ॥
संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु । या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥
तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? । आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें ॥ ३८० ॥
मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें । आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥
ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें । आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥
जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता । सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा ॥ ३८३ ॥
आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें । तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥
म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया । काढीं मातें महाभया- । पासोनियां ॥ ३८५ ॥
हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती । ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों ॥ ३८६ ॥
जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा । जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥
परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा । तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥
कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु । बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥
अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां । कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥
हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें । कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें ॥ ३९१ ॥

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः । भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६॥
नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर । हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं ॥ ३९२ ॥
आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये । तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी ॥ ३९३ ॥
मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां । आरणीं हन थाटा । देतासि मिठी ॥ ३९४ ॥
जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर । मुखाआंत भार । हारपताति मा ॥ ३९५ ॥
कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी । तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥
चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां । दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥
हां गा भीष्मा{ऐ}सा कवणु । सत्यशौर्यनिपुणु । तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥
अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु । आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें ॥ ३९९ ॥
कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया । मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण ॥ ४०० ॥
मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती । तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों ॥ ४०१ ॥
म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके । माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां ॥ ४०२ ॥
पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले । मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥
परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें । आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥
आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे ? । महाकाळेंसि कें खेळें ? । आंगवत असे ॥ ४०५ ॥
ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु । परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा ॥ ४०६ ॥
जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें । तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥
अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं । हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे ॥ ४०८ ॥
परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता । मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे ॥ ४०९ ॥

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि । केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७॥
तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें । वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥
कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी । तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे ॥ ४११ ॥
नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें । जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती ॥ ४१२ ॥
तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें । परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥
अशोकाचे अंगवसे । चघळिले कर्हेनि जैसे । लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले ॥ ४१४ ॥
परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं । पीठ होत कैसीं । दिसत आहाती ॥ ४१५ ॥
तियें रत्नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं । कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥
हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें । परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥
तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं । म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥
मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं । जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे ॥ ४१९ ॥
यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं । आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला ॥ ४२० ॥
ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत । येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥
आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित । परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥

No comments:
Post a Comment