अध्याय १० : ओव्या ७४-११८

११ ऑगस्ट  २०१९ निरुपण 
अध्याय १० : विभूतीयोगः (गीता श्लोक ३-८  / ज्ञानेश्वरी ओव्या ७४-११८)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् । असंमूढः स मर्त्येषु सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३॥
तेथ राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें । अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां ॥ ७४ ॥
मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु । ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें ॥ ७५ ॥
तो पाषाणांमाजीं परिसु । जैसा रसाआंतु सिद्धरसु । तैसा मनुष्याआंतु तो अंशु । माझाचि जाण ॥ ७६ ॥
तें चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ । येर माणुसपण तें भांब । लौकिक भागु ॥ ७७ ॥
अगा अवचिता कापुरा- । माजीं सांपडला हिरा । वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं ॥ ७८ ॥
तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु । तर्‍ही प्रकृतिदोषाची मातु । नेणेंचि कीं ॥ ७९ ॥
तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं । तेवीं मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घापे ॥ ८० ॥
तेंचि आमुतें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें । तरी मी ऐसा हें माझें । भाव ऐकें ॥ ८१ ॥
जे वेगळालिया भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती । विखुरले आहेती त्रिजगतीं । आघविये ॥ ८२ ॥
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा सत्यं दमः शमः । सुखं दुःखं भवोऽभावो भयं चाभयमेव च ॥ ४॥
अहिंसा समता तुइष्टास्तपो दानं यशोऽयशः । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः ॥ ५॥
तेथ प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी । असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य ॥ ८३ ॥
मग शम दम दोन्ही । सुखदुःख वर्ते जें जनीं । अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं ॥ ८४ ॥
पैं भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता । तुइष्टि तप पंडुसुता । दान जें गा ॥ ८५ ॥
अगा यश अपकीर्ती । हे जे भाव सर्वत्र दिसती । ते मजचि पासूनि होती । भूतांचिया ठायीं ॥ ८६ ॥
जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं । एक उपजती माझ्या ज्ञानीं । एक नेणती मातें ॥ ८७ ॥
प्रकाशु आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें । प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं ॥ ८८ ॥
आणि माझें जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें । म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे ॥ ८९ ॥
यापरी माझिया भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी । गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा ॥ ९० ॥
आतां इये सृष्टीचे पालक । जयां आधीन वर्तती लोक । ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज ॥ ९१ ॥
महर्षयः सप्त पूर्वे चत्वारी मनवस्तथा । मद्‍भवा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६॥
तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध । कश्यपादि प्रसिद्ध । सप्तऋषी ॥ ९२ ॥
आणिकही सांगिजतील । जे कां चौदाआंतुल मुद्दल । स्वायंभू मुख्य वडील । चारी मनु ॥ ९३ ॥
ऐसें हे अकरा । माझ्या मनीं जाहाले धनुर्धरा । सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां ॥ ९४ ॥
जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे । तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे ॥ ९५ ॥
तैंचि हे जाहाले । मग इहीं लोक केले । तेथ अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन ॥ ९६ ॥
म्हणौनि अकराही हे राजा । मग येर जग यांचिया प्रजा । एवं विश्वविस्तारु हा माझा । ऐसेंचि जाण ॥ ९७ ॥
पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे ॥ ९८ ॥
खांदियांपासूनि अनेका । फुटलिया नाना शाखा । शाखांस्तव देखा । पल्लव पानें ॥ ९९ ॥
पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ । तें निर्धारितां केवळ । बीजचि आघवें ॥ १०० ॥
तैंसे मी एकचि पहिलें । मग मी तेंचि मनातें व्यालें । तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥ १०१ ॥
इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक सृजिले । लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥ १०२ ॥
ऐसेनि हें विश्व येथें । मीचि विस्तारिलोंसें निरुतें । परी भावाचेनि हातें । माने जया ॥ १०३ ॥
एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः । सोऽविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७॥
यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती । आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें जग ॥ १०४ ॥
म्हणौनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी । मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥ १०५ ॥
ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें । म्हणौनि उत्तमाधम भेदाचें । दुःस्वप्न न देखे ॥ १०६ ॥
मी माझिया विभूती । विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती । हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥ १०७ ॥
म्हणौनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें । एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥
कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी । तयाचिये भजनाचे नाटीं । सूती मज ॥ १०९ ॥
म्हणौनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु । करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं ॥ ११० ॥
तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा । साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥ १११ ॥
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८॥
तरि मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा । आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥
कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा । आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥ ११३ ॥
ऐसें आघवाचि ठायीं । तया जळचि जेवीं पाहीं । तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये ॥ ११४ ॥
ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें । परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥ ११५ ॥
देश काळ वर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न । जैसा वायु होऊन गगन । गगनींचि विचरे ॥ ११६ ॥
ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं । जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें ॥ ११७ ॥
जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥ ११८ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099