स्नेहा विरगांवकर स्वाध्याय

 नमस्कार सगळ्यांना 

स्वतः हा स्वतः चे आत्मनिरीक्षण करून स्वाध्याय करणे तसे कठीणच... 

पण हा विषय घेऊन सगळ्यांना स्वतः हा स्वताची ओळख करून घेण्यासाठी प्रेरीत केले या साठी पहिले विवेक दादा, मंजिरी व काकु माऊली यांचे आभार व धन्यवाद. 

मला लहानपणापासून वाचनाची आवड होती. घरात कोणी गुरू केले नव्हते. कि स्वाध्याय नव्हता. पुजा-आर्च व अन्नदान होत होते त्यामुळे सात्त्विकता होतीच. 

लग्न करून या घरात आल्यावर. येथेही कायम यज्ञ-याग होत असत नानामहाराज गुरू स्थानी होते घरातच दत्त मंदिर होते सर्व दत्त भक्त होते त्यामुळे येथे हि सात्त्विकता होती. 

परंतु आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि मग स्वताचा शोध घेण्यासाठी आणि माझ्या च आयुष्यात काही गोष्टी का घडल्या याचा शोध घेण्यासाठी मी ज्ञानेश्वरी वाचन सुरू केले याआधी मी कधी वाचली नव्हती. 

जेव्हा वाचन सुरू केले त्या वेळी रजोगुण वाढला होता 

या सत्व व रजो गुणांचा बॅलन्स करत. मला समजत नव्हती तरी सतत ज्ञानेश्वरी वाचत होती मग मी अभ्यास करून सत्व गुण वाढवण्यासाठी गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या, तुकाराम गाथा, नामदेव गाथा या परीक्षा दिल्या 

सिंगल parents म्हणून माझी जबाबदारी खुप मोठी होती. 

बिझनेस सांभाळणे, मुलांना सांभाळणे व अनेक सरकारी कामे करावी लागत होती त्यामुळे अनेक लोकांच्या संपर्कात येत होते माझ्या रजोगुणाला मी एका कप्प्यात कोंडुन ठेवले व सत्व वाढविले. 

परंतु अनेक कामे करतांना आपण समोरच्या ला बदलु शकत नव्हते पण काम करुन घेणे तर महत्वाचे होते अशा वेळी काय करावे हा प्रश्न होता. 

मग मी स्वतः मधे बदल करून काही वेळेला रजोगुनांचा वापर करून काम करून घेत होते कारण त्यावेळी कोणत्याही गुणांचा विचार न करता काम करुन घेणे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. 

आज मुले मोठी झाली जवाबदारी कमी झाली अशावेळी पुर्ण वेळ स्वाध्याय करून सत्वगुण सतत राहावा म्हणून प्रयत्न करते 

यात माझे भाग्य मोठे कि दोन वर्षे बेंगलोरला आली त्या वेळी खूप छान आशा स्वाध्यायी मैत्रिणी भेटल्या मागच्या जन्माचे ऋणानुबंध असतील म्हणून... 

तसेच अजूनही ज्ञानेश्वरी मार्फत काकु माऊली व विवेकदादा यांचे मार्गदर्शन होत आहे त्यामुळे ज्ञानेश्वरी अजुनही समजुन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. 

धन्यवाद

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099