१७ नोव्हेंबर २०१९ निरुपण
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक १५-१६ / ज्ञानेश्वरी ओव्या २५५-२९३ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अर्जुन उवाच ।
पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ॥ ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींश्चसर्वानुरगांश्च दिव्यान् ॥ १५॥

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं । जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों ॥ २५५ ॥
परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥ २५६ ॥
देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें । तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें ॥ २५७ ॥
अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें ।कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं ॥ २५८ ॥
तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं । स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं ॥ २५९ ॥
प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक । आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें ॥ २६० ॥
जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? । आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे ॥ २६१ ॥
श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं । आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे ॥ २६२ ॥
पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें । देखतसें पाताळें । पन्नगेंशीं ॥ २६३ ॥
किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती । इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों ॥ २६४ ॥
आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक । ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें ॥ २६५ ॥
अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनंतरूपम् । नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ॥ १६॥

त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें । तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें ॥ २६६ ॥
तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर । करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं ॥ २६७ ॥
मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें । तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं ॥ २६८ ॥
जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें । कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें ॥ २६९ ॥
तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती । आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ ॥ २७० ॥
हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ । हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें ॥ २७१ ॥
हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें । अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां ॥ २७२ ॥
इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें । तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें ॥ २७३ ॥
ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि । आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें ॥ २७४ ॥
तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे । तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां ॥ २७५ ॥
तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि । तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता ॥ २७६ ॥
तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा । तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी ॥ २७७ ॥
तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा । पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा ॥ २७८ ॥
किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता । हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां ॥ २७९ ॥
परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु । जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं ॥ २८० ॥
एर्हवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं । म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ ॥ २८१ ॥
एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता । देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा ॥ २८२ ॥
तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी । लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी ॥ २८३ ॥
नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं । दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया ॥ २८४ ॥
हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा । कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी ॥ २८५ ॥
जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप ॥ २८६ ॥
जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती । एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया ॥ २८७ ॥
ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा । हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं ॥ २८८ ॥
तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा । मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी ॥ २८९ ॥
कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे । खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं ॥ २९० ॥
ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा । कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती ॥ २९१ ॥
तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला । म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा ॥ २९२ ॥
परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें । रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां ॥ २९३ ॥

No comments:
Post a Comment