२ ऑगस्ट २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ८ / ज्ञानेश्वरी ओव्या ५२५ -५९३)
आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्तें करी । परी केलेंपण शरीरीं । वसों नेदी ॥ ५२५ ॥
वर्णाश्रमपोषकें । कर्में नित्यनैमित्तिकें । तयामाजीं कांहीं न ठके । आचरतां ॥ ५२६ ॥
परि हें मियां केलें । कीं हें माझेनि सिद्धी गेलें । ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं ॥ ५२७ ॥
जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें । कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें ॥ ५२८ ॥
कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले । तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें ॥ ५२९ ॥
ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती । तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा ॥ ५३० ॥
एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली । एकावळीची काढिली । दोरी जैसी ॥ ५३१ ॥
संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं । देहीं कर्में तैसीं । जयासि गा ॥ ५३२ ॥
मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र । बैलावरी शास्त्र । बांधलें आहे ॥ ५३३ ॥
तया पाडें देहीं । जया मी आहे हे सेचि नाहीं । निरहंकारता पाहीं । तया नांव ॥ ५३४ ॥
हें संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे । इयेविषीं अनारिसें । बोलों नये ॥ ५३५ ॥
आणि जन्ममृत्युजरादुःखें । व्याधिवार्धक्यकलुषें । तियें आंगा न येतां देखे । दुरूनि जो ॥ ५३६ ॥
साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया । पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥
वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि न वचे । तेवीं अतीता जन्माचें । उणें जो वाहे ॥ ५३८ ॥
डोळां हरळ न विरे । घाईं कोत न जिरे । तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख ॥ ५३९ ॥
म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रें निघाला । कटा रे मियां चाटिला । कुचस्वेदु ॥ ५४० ॥
ऐस{ऐ}सिया परी । जन्माचा कांटाळा धरी । म्हणे आतां तें मी न करीं । जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥
हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया । कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे ॥ ५४२ ॥
मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें । तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं ॥ ५४३ ॥
परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज । संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥
आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे । परी आजीचि होये । सावधु जो ॥ ५४५ ॥
माजीं अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता । पोहणारा आइता । कासे जेवीं ॥ ५४६ ॥
कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो । वोडण सुइजे घावो । न लागतांचि ॥ ५४७ ॥
पाहेचा पेणा वाटवधा । तंव आजीचि होईजे सावधा । जीवु न वचतां औषधा । धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥
येऱ्हवीं ऐसें घडे । जो जळतां घरीं सांपडे । तो मग न पवाडे । कुहा खणों ॥ ५४९ ॥
चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला । तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे ॥ ५५० ॥
म्हणौनि समर्थेंसीं वैर । जया पडिलें हाडखाइर । तो जैसा आठही पाहर । परजून असे ॥ ५५१ ॥
नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी । तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना ॥ ५५२ ॥
पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी । मरणें मृत्यु मारी । आपण उरे ॥ ५५३ ॥
तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें । जया जन्ममृत्युचें । निमालें शल्य ॥ ५५४ ॥
आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा । तारुण्याचिया भरा- । माजीं देखे ॥ ५५५ ॥
म्हणे आजिच्या अवसरीं । पुष्टि जे शरीरीं । ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी ॥ ५५६ ॥
निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय । अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया ॥ ५५७ ॥
फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा । तें करेयाचा गुडघा । तैसें होईल ॥ ५५८ ॥
वोढाळाच्या खुरीं । आखरुआतें बुरी । ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा ॥ ५५९ ॥
पद्मदळेंसी इसाळे । भांडताति हे डोळे । ते होती पडवळें । पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे । उरु कुहिजैल जळें । आंसुवाचेनि ॥ ५६१ ॥
जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड । तैसें पिचडीं तोंड । सरकटिजैल ॥ ५६२ ॥
रांधवणी चुलीपुढें । पऱ्हे उन्मादती खातवडे । तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती ॥ ५६३ ॥
तांबुलें वोंठ राऊं । हांसतां दांत दाऊं । सनागर मिरऊं । बोल जेणें ॥ ५६४ ॥
तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा । इया उमळती दाढा । दातांसहित ॥ ५६५ ॥
कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं । तैसी नुठी कांहीं केली । जीभचि हे ॥ ५६६ ॥
कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं । तैसा आपदा तोंडीं । दाढियेसी ॥ ५६७ ॥
आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें । तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर ॥ ५६८ ॥
वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु । पिंड गरुवा माकडु । होईल हा ॥ ५६९ ॥
तृणाचें बुझवणें । आंदोळे वारेनगुणें । तैसें येईल कांपणें । सर्वांगासी ॥ ५७० ॥
पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी । बरवपणा बागडी । नाचविजैल ॥ ५७१ ॥
मळमूत्रद्वारें । होऊनि ठाती खोंकरें । नवसियें होती इतरें । माझियां निधनीं ॥ ५७२ ॥
देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु । सोइरियां उबगु । येईल माझा ॥ ५७३ ॥
स्त्रियां म्हणती विवसी । बाळें जाती मूर्छी । किंबहुना चिळसी । पात्र होईन ॥ ५७४ ॥
उभळीचा उजगरा । सेजारियां साइलिया घरा । शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांतें हा ॥ ५७५ ॥
ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं । देखे मग मनीं । विटे जो गा ॥ ५७६ ॥
म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल । मग काय उरेल । हितालागीं ? ॥ ५७७ ॥
म्हणौनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें । पंगु न होता जावें । तेथ जाय ॥ ५७८ ॥
दृष्टी जंव आहे । तंव पाहावें तेतुलें पाहे । मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें ॥ ५७९ ॥
हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे । आणि करूनि घाली सकळें । दानादिकें ॥ ५८० ॥
ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें । तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान ॥ ५८१ ॥
जैं चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती । का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे ॥ ५८२ ॥
तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें । तें आतांचि आघवें । सवतें करीं ॥ ५८३ ॥
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें । तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥
तैसें वृद्धाप्य होये । आलेपण तें वायां जाये । जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा ॥ ५८५ ॥
झाडिलींचि कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं । जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई ? ॥ ५८६ ॥
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें । वार्धक्या जो नागवे । तयाच्या ठायीं जाणावें । ज्ञान आहे ॥ ५८७ ॥
तैसेंचि नाना रोग । पडिघाती ना जंव पुढां आंग । तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली ॥ ५८८ ॥
सापाच्या तोंडी । पडली जे उंडी । ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥
तैसा वियोगें जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे । तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय ॥ ५९० ॥
आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें । तयां कर्मरंध्री गुंडे । नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥
ऐस{ऐ}सिया आइती । जयाची परी असती । तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा ॥ ५९२ ॥
आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक । सांगेन आइक । धनंजया ॥ ५९३ ॥

No comments:
Post a Comment