१७ फेब्रुवारी २०१९ निरुपण
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक ५-१२ / ज्ञानेश्वरी ओव्या ५९-११६)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भवं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५॥
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें । जे आदींचि तया मातें । जाणोनि अंतीं ॥ ५९ ॥
ते देह झोल ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण हौनी । जैसा मठ गगना भरुनी । गगनींचि असे ॥ ६० ॥
ये प्रतीतीचिया माजघरीं । तया निश्चयाची वोवरी । आली म्हणौनि बाहेरी । नव्हेचि से ॥ ६१ ॥
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें । बाहेरि भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं ॥ ६२ ॥
आतां उभेयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें । म्हणौनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले ॥ ६३ ॥
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली । जैसी समरससमुद्रीं धुतली । रुळेचिना ॥ ६४ ॥
पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला । पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे ? ॥ ६५ ॥
नातरी सर्पें कवच सांडिलें । कां उबारेनें वस्त्र फेडिलें । तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं ? ॥ ६६ ॥
तैसा आकारु हा आहाच भ्रंशे । वांचूनी वस्तु ते सांचलीचि असे । तेचि बुद्धि जालिया विसकुसे । कैसेनि आतां ॥ ६७ ॥
म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥
एर्हवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण । जो आठवु धरी अंतःकरण । तेंचि होईजे ॥ ६९ ॥
जैसा कवणु एकु काकुळती । पळतां पवनगती । दुपाउलीं अवचितीं । कुहामाजीं पडियेला ॥ ७० ॥
आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें । नाहीं म्हणौनि तेथें । पडावेंचि पडे ॥ ७१ ॥
तेविं मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके । तें होणें मग न चुके । भलतयापरी ॥ ७२ ॥
आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे । डोळां लागतखेंवो देखिजे । तेंचि स्वप्नीं ॥ ७३ ॥
यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६॥

तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७॥

डोळां जें देखावें । कां कानीं हन ऐकावें । मनीं जें भावावें । बोलावें वाचें ॥ ७६ ॥
तें आंत बाहेरी आघवें । मीचि करूनि घालावें । मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें ॥ ७७ ॥
अर्जुना ऐसें जाहालिया । मग न मरिजे देह गेलिया । मा संग्रामु केलिया । भय काय तुज ? ॥ ७८ ॥
तूं मन बुद्धि सांचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी । तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक ॥ ७९ ॥
हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे । तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें ॥ ८० ॥
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ॥ ८॥

येणेंचि अभ्यासेंसी योगु । चित्तासि करी पां चांगु । अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी ॥ ८१ ॥
तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरुषाची मोहर । लावीं मग शरीर । राहो अथवा जावो ॥ ८२ ॥
जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें । मग कवण आठवी देहातें । गेलें कीं आहे ? ॥ ८३ ॥
पैं सरितेचेनि ओघें । सिंधुजळा मीनलें घोघें । तें काय वर्तत आहे मागें । म्हणौनि पाहों येती ? ॥ ८४ ॥
ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें । जेथ यातायात निमालें । घनानंद जें ॥ ८५ ॥

कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्यः । सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९॥
जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें । जें आघवेंचि आघवेंपणें । देखत असे ॥ ८६ ॥
जें गगनाहूनि जुनें । जें परमाणुहूनि सानें । जयाचेनि सन्निधानें । विश्व चळे ॥ ८७ ॥
जें सर्वांते यया विये । विश्व सर्व जेणें जिये । हेतु जया बिहे । अचिंत्य जें ॥ ८८ ॥
देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे । जे दिहाचे अंधारें । चर्मचक्षूसीं ॥ ८९ ॥
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी । अस्तमानाचे जयासी । आडनांव नाहीं ॥ ९० ॥

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव । भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १०॥
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते । जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे ॥ ९१ ॥
बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि । जीवीं सुख सूनि । क्रमयोगाचे ॥ ९२ ॥
आंतु मीनलेनि मनोधर्में । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें । आपेआप संभ्रमें । मिळावया ॥ ९३ ॥
आकळलेनि योगें । मध्यमा मध्य मार्गें । अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ॥ ९४ ॥
तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु । जेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥ ९५ ॥
परी मनाचेनि स्थैर्यें धरिला । भक्तीचिया भावना भरला । योगबळें आवरला । सज्ज होऊनि ॥ ९६ ॥
तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतामाजीं संचरतु । जैसा घंटानाद लयस्तु । घंटेसीच होय ॥ ९७ ॥
कां झांकलिया घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीतीं जो पांडवा । देह ठेवी ॥ ९८ ॥
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम । तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥ ९९ ॥

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११॥
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी । तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षरु म्हणिपे ॥ १०० ॥
चंडवातेंही न मोडे । तें गगनचि की फुडें । वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैंचें ? ॥ १०१ ॥
तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणिवलेपणेंचि उमाणलें । मग नेणवेचि तया म्हणितलें । अक्षर सहजें ॥ १०२ ॥
म्हणौनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर । जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप ॥ १०३ ॥
आणि विषयांचे विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित्त देऊनि । आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥ १०४ ॥
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात । निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥ १०५ ॥
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं । निष्ठुर होऊनि बापुडीं । इंद्रियें करिती ॥ १०६ ॥
ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध । जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले ॥ १०७ ॥
तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती । तरी पार्था हेचि स्थिती । एकवेळ सांगों ॥ १०८ ॥
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी । तंव सहजें कृपा केली तुम्हीं । तरी बोलिजो कां ॥ १०९ ॥
परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें । तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥ ११० ॥
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे । हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे ॥ १११ ॥

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च । मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२॥
परी हे तरीच घडे । जरी संयमाचीं अखंडें । सर्वद्वारीं कवाडें । कळासती ॥ ११२ ॥
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें । जैसें करचरणीं मोडलें । परिवरु न संडीं ॥ ११३ ॥
तैसें चित्त राहिलिया पांडवा । प्राणांचा प्रणवुचि करावा । मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी ॥ ११४ ॥
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें । जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं ॥ ११५ ॥
तंववरी तो समीरु । निराळीं कीजे स्थिरु । मग लग्नीं जेविं ॐकारु । बिंबींच विलसे ॥ ११६ ॥

No comments:
Post a Comment