अध्याय १६ : ओव्या १-१०

७ मार्च २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ज्ञानेश्वरी ओव्या १-१० )


॥  श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षोडशोशोऽध्यायः – अध्याय सोळावा । ।
। दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।

मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥ १ ॥
जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ २ ॥
जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥ ३ ॥
लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्‍भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥ ४ ॥
शब्दाचिया आसकडीं । भेद नदीच्या दोहीं थडीं । आरडाते विरहवेडीं । बुद्धिबोधु ॥ ५ ॥
तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।भोगवी जो चिद्‍गगन । भुवनदिवा ॥ ६ ॥
जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥ ७ ॥
जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ॥ ८ ॥
जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरीं स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ तें ॥ ९ ॥
जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया ।लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं ॥ १० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099