अध्याय १३ : ओव्या १०५०-१०७९

४ ऑक्टोबर २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २६-२८ /  ज्ञानेश्वरी ओव्या  १०५०-१०७९ )



यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ ॥ २६॥


तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥ १०५१ ॥
तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥ १०५२ ॥
कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥ १०५३ ॥
नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥ १०५४ ॥
तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥ १०५५ ॥
इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥ १०५६ ॥


समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम् । विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति ॥ २७॥


पैं पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि तें आहे । ऐसां खोलीं डोळां पाहें । ऐक्य हें गा ॥ १०५७ ॥
भूतें आघवींचि होती । एकाचीं एक आहाती । परी तूं प्रतीती । यांची घे पां ॥ १०५८ ॥
यांचीं नामेंही आनानें । अनारिसीं वर्तनें । वेषही सिनाने । आघवेयांचे ॥ १०५९ ॥
ऐसें देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं । तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघों ॥ १०६० ॥
पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घें वक्रें वर्तुळें । होती एकाचींच फळें । तुंबिणीयेचीं ॥ १०६१ ॥
होतु कां उजू वांकुडें । परी बोरीचे हें न मोडे । तैसी भूतें अवघडें । परी वस्तु उजू ॥ १०६२ ॥
अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैशी । तैसा नाना जीवराशीं । परेशु असे ॥ १०६३ ॥
गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा । तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो ॥ १०६४ ॥
हें भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम । घटमठीं व्योम । जिंयापरी ॥ १०६५ ॥
हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु । जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा ॥ १०६६ ॥
एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसीं अभिन्नु । देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजीं ॥ १०६७ ॥
ज्ञानाचा डोळा डोळसां- । माजीं डोळसु तो वीरेशा । हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो ॥ १०६८ ॥


समं पश्यन्हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ २८॥


जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥ १०६९ ॥
हें उघड पांचवेउली । पंचधां आगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥ १०७० ॥
ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाच्या उदरीं । दाटीचिना ॥ १०७१ ॥
परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥ १०७२ ॥
जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी । न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥ १०७३ ॥
जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर । तुर्येचें माजघर । परब्रह्म जें ॥ १०७४ ॥
मोक्षासकट गती । जेथें येती विश्रांती । गंगादि आपांपती । सरिता जेवीं ॥ १०७५ ॥
तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे । जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी ॥ १०७६ ॥
दीपांचिया कोडी जैसें । एकचि तेज सरिसें । तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
ऐसेनि समत्वें पंडुसुता । जिये जो देखत साता । तो मरण आणि जीविता । नागवे फुडा ॥ १०७८ ॥
म्हणौनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां । जे साम्यसेजे डोळां । लागला तया ॥ १०७९ ॥


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099