२७ जानेवारी २०१९ निरुपण
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग (गीता श्लोक २७-३० / ज्ञानेश्वरी ओव्या १६६-२१०)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
इच्छाद्वेषसत्मुत्थेन द्वंद्वमोहेन भारत ।सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७॥
तेथ इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली । तेथ द्वेषेंसीं मांडिली । वर्हाडिक ॥ १६६ ॥
तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वंद्वमोहो जाला । मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥
जो धृतीसी सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु । आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥
असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होऊनि धनुर्धरा । विषयांचे वोवरां । विकृतीशीं ॥ १६९ ॥
तेणें भावशुद्धीचिये वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे । मग चिरिलें आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥
तेणें भूतें भांबावलीं । म्हणौनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं । मग महादुःखाच्या घेतलीं । दांडे वरी ॥ १७१ ॥

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् । ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ॥ २८ ॥
ऐसे विकल्पाचे वांयाणे । कांटे देखोनि सणाणे । जे मतिभ्रमाचे पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥
उजू एकनिष्ठेच्या पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं । महापातकाची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥
मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले । किंबहुना चुकले । वाटवधेयां ॥ १७४ ॥

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये । ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥ २९॥
एर्हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा । ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥
तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्र परब्रह्में फळे । जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥
ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचें नवलपण पुरे । कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥
ऐसा अध्यात्मलाभु तया । होय गा धनंजया । भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥
तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी । तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तया ॥ १७९ ॥

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॥ ३०॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादो ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
जिहीं साधिभूता मातें । प्रतीतीचेनि हातें । धरूनि अधिदैवातें । शिवतले गा ॥ १८० ॥
जया जाणिवेचेनि वेगें । मी अधियज्ञुही दृष्टी रिगें । ते तनूचेनि वियोगें । विर्हये नव्हती ॥ १८१ ॥
एर्हवीं आयुष्याचें सूत्र विघडतां । भूतांची उमटे खडाडता । काय न मरतयाचियाहि चित्ता । युगांतु नोहे ? ॥ १८२ ॥
परी नेणों कैसे पैं गा । जे जडोनि गेले माझिया आंगा । ते प्रयाणींचिया लगबगा । न सांडितीच मातें ॥ १८३ ॥
एर्हवी तरीं जाण । ऐसे जे निपुण । तेचि अंतःकरण- । युक्त योगी ॥ १८४ ॥
तंव इये शब्दकुपिकेतळीं । नोडवेचि अवधानाची अंजुळी । जे नावेक अर्जुन तये वेळीं । मागांचि होता ॥ १८५ ॥
जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें । बहकताती परिमळें । भावाचेनि ॥ १८६ ॥
सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥ १८७ ॥
तियें प्रमेयाची हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाच्या सागरीं चुबुकळिलीं । मग तैसीचि कां घोळिलीं । परमानंदें ॥ १८८ ॥
तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥ १८९ ॥
तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाच्या जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥ १९० ॥
ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥ १९१ ॥
झडकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें । प्रतीतिमुखीं एके वेळे । घालूं पाहे ॥ १९२ ॥
तंव विचाराचिया रसना न दाटती । परी हेतूच्या दशनीं न फुटती । ऐसें जाणौनि सुभद्रापती । चुंबिचिना ॥ १९३ ॥
मग चमत्कारला म्हणे । इयें जळींचीं मा तारांगणें । कैसा झकविलों असलगपणें । अक्षरांचेनि ॥ १९४ ॥
इयें पदें नव्हती फुडिया । गगनाचिया घडिया । येथ आमुची मति बुडालिया । थावो न निघे ॥ १९५ ॥
वांचूनि जाणावयाची कें गोठी । ऐसें जीवीं कल्पूनि किरीटी । तिया पुनरपि केली दृष्टी । यादवेंद्रा ॥ १९६ ॥
मग विनविलें सुभटें । हां हो जी ये एकवाटे । सातही पदें अनुच्छिष्टें । नवलें आहाती ॥ १९७ ॥
एर्हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणें । काय श्रवणाचेनि आंगवणें । बोंलों लाहाती ? ॥ १९८ ॥
परी तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥ १९९ ॥
कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥ २०० ॥
तेवींचि अर्थाची चाड मज आहे । तें सांगतांही वेळु न साहे । म्हणौनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥ २०१ ॥
ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्राय दृष्टी सूनी । तेवींचि माजीं शिरौनी । आर्ती आपुली ॥ २०२ ॥
कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदीं शिंव । एर्हवीं श्रीकृष्ण हृदयासि खेंव । देवों सरला ॥ २०३ ॥
अहो श्रीगुरूतें जैं पुसावें । तैं येणें मानें सावध होआवें । हें एकचि जाणें आघवें । सव्यसाची ॥ २०४ ॥
आतां तयाचें तें प्रश्न करणें । वरी सर्वज्ञ श्रीहरीचें बोलणें । संजयो आवडलेपणें । सांगैल कैसें ॥ २०५ ॥
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी । जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ॥ २०६ ॥
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा । अक्षरांचिया भांबा । इंद्रियें जिती ॥ २०७ ॥
पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें । परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ? ॥ २०८ ॥
तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा । मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजे ॥ २०९ ॥
ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें । ऐका ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ २१० ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तमोध्यायः ॥
No comments:
Post a Comment