अध्याय ४ : ओव्या ४१-४८

४ फेब्रुवारी २०१८ निरुपण
अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यासयोग  (गीता श्लोक ५-६/ ज्ञानेश्वरी ओव्या ४१-४८)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


श्रीभगवानुवाच ।
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५॥
तंव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता । तैं आम्हीं नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥
तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी । बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥ ४२ ॥
मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें । तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीष्वरोऽपि सन् । प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६॥
म्हणौनि हें आघवें । मागील मज आठवें । मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥ ४४ ॥
माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे । तें प्रतिबिंबें मायावशें । माझ्याचि ठायीं ॥ ४५ ॥
माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे । तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥
कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें । एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ? ॥ ४७ ॥
तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं । तैं साकारपणें नट नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099