१७ मार्च २०१९ निरुपण
अध्याय ८ : अक्षरब्रह्मयोगः (गीता श्लोक २४-२८ / ज्ञानेश्वरी ओव्या २२०-२७१)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४॥
आंत अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु । आणि सामासांमाजीं मासु । उत्तरायण ॥ २२० ॥
ऐशिया समयोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेविती । ते ब्रह्मचि होती । ब्रह्मविद ॥ २२१ ॥
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा । तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयां पैं ॥ २२२ ॥
एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें । दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥ २२३ ॥
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान । येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥ २२४ ॥
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे । आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २२५ ॥

धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५॥
तरी प्रयाणाचिया अवसरें । वातश्लेष्मां सुभरें । तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥ २२६ ॥
सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥ २२७ ॥
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥ २२८ ॥
जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ॥ २२९ ॥
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥ २३० ॥
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥ २३१ ॥
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणौनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥ २३२ ॥
ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती । आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ॥ २३३ ॥
इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं । तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेंनि आइके ? ॥ २३४ ॥
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे । मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥ २३५ ॥
आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा । आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥ २३६ ॥
येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥ २३७ ॥

शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६॥
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणौनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥ २३८ ॥
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥ २३९ ॥
पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणौनियां अडवीं । रिगवत असे ॥ २४० ॥
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडूं शके ? । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ २४१ ॥
म्हणौनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अनवसरें कहीं ॥ २४२ ॥
एर्हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम । जन्मे अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥ २४३ ॥
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटें धूम्रपंथें पडलिया । तरी संसारपांथीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥ २४४ ॥
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे । म्हणौनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही ॥ २४५ ॥
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे । परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥ २४६ ॥

नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७॥
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वांया अवचटें काय पावे । देह त्यजूनि वस्तु होआवें । मार्गेंचि कीं ? ॥ २४७ ॥
तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों । कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी ॥ २४८ ॥
मज तरंगपण असे कीं नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ? ।तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं ॥ २४९ ॥

तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ २५० ॥
आतां शरीराचें तयाचिया ठाई । आडनांवही उरलें नाहीं । तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥ २५१ ॥
मग मार्गातें कासया शोधावें ? । कोणें कोठूनि कें जावें ? । जरी देशकालादि आघवें । आपणचि असे ॥ २५२ ॥
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचें आकाश लागे नीट वाटे । वाटा लागे तरी गगना भेटे । एर्हवीं चुके ? ॥ २५३ ॥
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥ २५४ ॥
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचे सांकडें । तया सोऽहंसिद्धां न पडे । योगियांसी ॥ २५५ ॥
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपैसया होईल ॥ २५६ ॥
मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघडु नाहीं ॥ २५७ ॥
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवें ।माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥ २५८ ॥
येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पायें । निजरूपा ये ॥ २५९ ॥
पै गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥ २६० ॥

वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टाम् । अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टामोऽध्यायः ॥ ८ ॥
जरी वेदाध्ययनाचें जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें । कीं तपोदानांचे जोडलें । सर्वस्व हन जें ॥ २६१ ॥
तया आघवयाचि पुण्याचा मळा । भारु आंतौनि जया ये फळा । तें परब्रह्मा निर्मळा । सांटि न सरे ॥ २६२ ॥
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळा न दिसे सानें । पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा ॥ २६३ ॥
जें विटे ना सरे । भोगी तयाचेनि पवाडें पुरे । पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि ॥ २६४ ॥
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें । जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका ॥ २६५ ॥
तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें । अनुमानती कौतुकें । तंव हळुवट आवडे ॥ २६६ ॥
मग तया सुखाची किरीटी । करूनियां गा पाउटी । परब्रह्माचिये पाठीं । आरूढती ॥ २६७ ॥
ऐसे चराचरैक भाग्य । जें ब्रह्मेशां आराधना योग्य । योगियांचें भोग्य । भोगधन जें ॥ २६८ ॥
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा । जो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया ॥ २६९ ॥
जो सर्वज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा । तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रती बोलिला ॥ २७० ॥
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु । तेचि परियेसा पुढारी मातु । ज्ञानदेव म्हणे ॥ २७१ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां अष्टमोध्यायः ॥
No comments:
Post a Comment