अध्याय १२ : ओव्या ६०-१०३

८ मार्च २०२० निरुपण 
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक ५-८ /ज्ञानेश्वरी ओव्या  ६०-१०३)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५॥
जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥ ६० ॥
तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें । आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पाडोनि ठाती ॥ ६१ ॥
कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं ॥ ६२ ॥
ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥ ६३ ॥
उनी दिहाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ॥ ६४ ॥
शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरांआंतु ॥ ६५ ॥
किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा । भातारेंवीण करावा । तो हा योगु ॥ ६६ ॥
एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज । परी मरणेंसीं झुंज । नीच नवें ॥ ६७ ॥
ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख । डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ? ॥ ६८ ॥
म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥
पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें । तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों ॥ ७० ॥
म्हणौनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही । कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असें ? ॥ ७१ ॥
वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लागतां कांठी । सूर्याची पाउटी । कां होय गा ॥ ७२ ॥
यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा । तेवीं देहवंता जीवां । अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥
ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा । झोंबती तरी क्लेशा । पात्र होती ॥ ७४ ॥
म्हणौनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा । जे कां भक्तिपंथा । वोटंगले ॥ ७५ ॥
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः । अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६॥
कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें । जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं ॥ ७६ ॥
विधीतें पाळित । निषेधातें गाळित । मज देऊनि जाळित । कर्मफळें ॥ ७७ ॥
ययापरी पाहीं । अर्जुना माझें ठाईं । संन्यासूनि नाहीं । करिती कर्में ॥ ७८ ॥
आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं ॥ ७९ ॥
ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर । ध्यानमिषें घर । माझें झालें ॥ ८० ॥
जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी । भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥
ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें । तयांचे कायि एक सांगें । जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् । भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७॥
किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा । तो मातेचा सोयरा । केतुला पां ॥ ८३ ॥
तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां । घेतला पट्टा ॥ ८४ ॥
एर्‍हवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता । काय समर्थाची कांता । कोरान्न मागे ॥ ८५ ॥
तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे । कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी ॥ ८६ ॥
जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी । तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें ॥ ८७ ॥
भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे । तेथ जरी कीं माझे । बिहिती हन ॥ ८८ ॥
म्हणौनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा । करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥ ८९ ॥
नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं । सजूनियां संसारीं । तारू जाहलों ॥ ९० ॥
सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले । परीग्रहीं घातले । तरियावरी ॥ ९१ ॥
प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं । मग आणिले तटीं । सायुज्याचिया ॥ ९२ ॥
परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे । वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥ ९३ ॥
म्हणौनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता । तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा ॥ ९४ ॥
आणि जेव्हांचि कां भक्तीं । दीधली आपुली चित्तवृत्ती । तेव्हांचि मज सूति । त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥
याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया । शिकिजे जे यया । मार्गा भजिजे ॥ ९६ ॥
मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय । निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८॥

अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक । करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं ॥ ९७ ॥
इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेसीं । रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ॥ ९८ ॥
जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं । तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥
म्हणौनि दीप पालवे । सवेंचि तेज मालवे । कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय ॥ १०० ॥
उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं । तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥ १०१ ॥
म्हणौनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं । येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ १०२ ॥
यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं । आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥ १०३ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099