अध्याय १२ : ओव्या २०७-२४७

२५  मे  २०२० निरुपण 
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक १९-२०  /ज्ञानेश्वरी ओव्या २०७-२४७ )

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९॥
जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे । आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ २०७ ॥
तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती । विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥ २०८ ॥
साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी । जो भोगितां उन्मनी । आरायेना ॥ २०९ ॥
जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा ॥ २१० ॥
आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं । तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो ॥ २११ ॥
आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती । तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया ॥ २१२ ॥
हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३ ॥
मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था । तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४ ॥
उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक । परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां ॥ २१५ ॥
तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करितां जाणिजे प्रकारु । जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥ २१६ ॥
परी हे असो आतां । महेशातें वानितां । आत्मस्तुति होतां । संचारु असे ॥ २१७ ॥
ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें । अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥ २१८ ॥
जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं । रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु ॥ २१९ ॥
कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी । कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥ २२० ॥
म्हणौनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं । तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥
तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी । तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥ २२२ ॥
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे । हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥ २२३ ॥
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि । आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥ २२४ ॥
तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे । किंबहुना आवडे । निरुपमु ॥ २२५ ॥
तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ? । परी तयाचें चरित्र । ऐकती जे ॥ २२६ ॥
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें । जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २२७ ॥
जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत । भक्तियोगु समस्त- । योगरूप ॥ २२८ ॥
तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं । येवढी थोरी । जया स्थितीये ॥ २२९ ॥
ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥ २०॥
इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य । करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥ २३० ॥
तेसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे । जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती ॥२३१ ॥
परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं । मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥ २३२ ॥
परी मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि । हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ २३३ ॥
पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी । उत्कंठा तयांलागीं । अखंड मज ॥ २३४ ॥
तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र । भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां ॥ २३५ ॥
आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन । ते वांचूनि आन । गोमटें नाहीं ॥ २३६ ॥
तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान । किंबहुना समाधान । ते मिळती तैं ॥ २३७ ॥
पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता । ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥ २३८ ॥
ऐसे निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें । बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥ २३९ ॥
राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु । शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥
पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु । प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥ २४१ ॥
जो धर्मकीर्तिधवलु । आगाध दातृत्वें सरळु । अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु ॥ २४२ ॥
जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु । सत्यसेतु सकळु । कलानिधी ॥ २४३ ॥
तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा । सांगे येरु दैवाचा । आइकतु असे ॥ २४४ ॥
आतां ययावरी । निरूपिती परी । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥
तेचि रसाळ कथा । मर्‍हाठिया प्रतिपथा । आणिजेल आतां । आवधारिजो ॥ २४६ ॥
ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही । हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥
इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099