१२ मे २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक १६-१९/ ज्ञानेश्वरी ओव्या २६५-३०६)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् । मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६॥
तोचि जाणिवेचा जरी उदयो होये । तरी मुद्दल वेदु मीचि आहें ।आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा ।यज्ञु प्रकटे पांडवा । तोही मी गा ॥ २६६ ॥
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा ।आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥
होता मी हवन कीजे । तेथ अग्नी तो स्वरूप माझें ।आणि हुतक वस्तु जें जें । तेही मीचि ॥ २६८ ॥

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः । वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७॥
पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगें । जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ २६९ ॥
अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।तेवीं मी चराचरीं । माताही होय ॥ २७० ॥

आणि जाहाले जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे ।तें मी वांचूनि नोहे । आन निरुतें ॥ २७१ ॥
इयें प्रकृतिपुरुषें दोन्हीं । उपजलीं जयाचिया अमनमनीं ।तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥ २७२ ॥
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
जेथ नानामतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।तयाचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥
जया ॐकाराचिये कुशीं । अक्षरें होतीं औमकारेंसीं ।जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
म्हणौनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८॥
हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे ।ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥ २७८ ॥
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये ।जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥ २७९ ॥
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा एथ पंडुसुता । मी गोसावी असे समस्ता । त्रैलोक्याचा ॥ २८० ॥
आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगे नसावें । पावकें दाहावें । वर्षावें जळें ॥ २८१ ॥
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी । पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
म्यां बोलिविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले । म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥
मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूतां । इयें म्हणियागतें पंडुसुता । सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
जो ऐसा समर्थु । तो मी जगाचा नाथु । आणि गगना{ऐ}सा साक्षिभूतु । तोही मीचि ॥ २८५ ॥
इहीं नामरूपीं आघवा । जो भरला असे पांडवा । आणि नामरूपांचाही वोल्हावा । आपणचि जो ॥ २८६ ॥
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळीं आथी जळ । ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवासु मी ॥ २८७ ॥
जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारी मी जन्ममरण । यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥ २८८ ॥
मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतीगुणें । जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥ २८९ ॥
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता । तैसा ब्रह्मादि सर्वा भूतां । सुहृद तो मी ॥ २९० ॥
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा । सृष्टिक्षयप्रभवा । मूळ तें मी ॥ २९१ ॥
बीज शाखांतें प्रसवे । मग तें रूखपण बीजीं सामावे । तैसें संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारूपु । तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें स्थान मी ॥ २९३ ॥
इयें नामरूपे लोटती । वर्णव्यक्ती आटती । जातीचे भेद फिटती । जैं आकारू नाहीं ॥ २९४ ॥
तैं संकल्पवासनासंस्कार । माघौतें रचावया चराचर । जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥ २९५ ॥

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च । अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९॥
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे । पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढति भरे ॥ २९६ ॥
अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये । तैसें मरतें मारितें पाहें । स्वरूप माझें ॥ २९७ ॥
यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें । आणि न मरतें तंव सहजें । मीचि आहें ॥ २९८ ॥
आतां बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें । तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥ २९९ ॥
म्हणौनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे ? । परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ? ॥ ३०० ॥
तरंग पाणियेवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती । तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखें ॥ ३०१ ॥
हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें । कीं कैसें कर्म तयां आड आलें । जें मीचि नाहीं म्हणती ? ॥ ३०२ ॥
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयांतें कडिये काढिजे । ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासी ॥ ३०३ ॥
ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी । आढळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥ ३०४ ॥
तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे । म्हणौनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ? । तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥

No comments:
Post a Comment