१५ सप्टेंबर २०१९ निरुपण
अध्याय १० : विभूतीयोगः (गीता श्लोक १९-३१ / ज्ञानेश्वरी ओव्या २०६-२५८)
श्रीभगवानुवाच ।
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९॥

मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता । कीं म्हणतसे बा पंडुसुता । भलें केलें ॥ २०६ ॥
अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । आंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें ? ॥ २०७ ॥
परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो । मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा ॥ २०८ ॥
तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती । ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना ॥ २०९ ॥
आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती । तैसिया माझिया विभूती । असंख्य मज ॥ २१० ॥
एर्हवीं तरी मी कैसा केवढा । म्हणौनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया आइकें ॥ २११ ॥
जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणवतील किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय ॥ २१२ ॥
कां उद्यान हाता चढिन्नलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें । तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ ॥ २१३ ॥
एर्हवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा ।पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०॥

आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।मी आत्मा असें एकैका । भूतमात्राच्या ठायीं ॥ २१५ ॥
आंतुलीकडे मीचि यांचे अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि ॥ २१६ ॥
जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी । आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥
पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती । तेवीं आदि स्थिती गती । भूतांसि मी ॥ २१८ ॥
ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण । तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक ॥ २१९ ॥
याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें सुभद्रापती । सांगेन म्हणितलें तुजप्रती । त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् । मरीचिर्मरूतामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१॥
हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु । रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥
मरूद्गणांच्या वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी । चंद्रु मी गगनरंगीं । तारांमाजीं ॥ २२२ ॥

वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः । इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२॥
वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु । देवांमाजी मरुद्बंधु । महेंद्रु तो मी ॥ २२३ ॥
इंद्रियांमाजीं अकरावें । मन तें मी हें जाणावें । भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी ॥ २२४ ॥

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३॥
अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी । तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥
यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥ २२६ ॥
मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं ।शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥ २२७ ॥

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५॥
जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥ २२८ ॥
त्रिभुवनींचिया सेनापतीं- आंत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥
सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥ २३० ॥
अशेषांही वाचा- । माजीं नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥
समस्तांही यज्ञांच्या पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥ २३२ ॥
नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥
स्थावरां गिरीआंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥

अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भवम् । ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७॥
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातांआंतु । अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥
देवऋषींआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वां । सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥
ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥
राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥
ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥ २३९ ॥

आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् । प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् । पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९॥
पैं आघवेयां हातियेरां- । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥ २४० ॥
धेनूंमध्यें कामधेनु । तें मी म्हणे विष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥ २४१ ॥
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ॥ २४२ ॥
अगा यादसांआंतु । जो पश्चिम प्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥ २४३ ॥
आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वता । बोलत आहें ॥ २४४ ॥
जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥ २४५ ॥
तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे आत्मारामु । रमापती ॥ २४६ ॥
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् । मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०॥

अगा दैत्यांचिया कुळीं । प्रर्हादु तो मी न्याहाळीं । म्हणौनि दैत्यभावादि मेळीं । लिंपेचि ना ॥ २४७ ॥
पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण ॥ २४८ ॥
पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥ २४९ ॥

पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् । झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी ॥ ३१॥
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा । एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा कीजे ॥ २५० ॥
तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पंडुसुता । शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥
जेणें सांकडलिया धर्माचें कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें । विजयलक्ष्मिये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥ २५२ ॥
पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं । गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां ॥ २५३ ॥
जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला । सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां ॥ २५४ ॥
तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु । मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥ २५५ ॥
पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा । जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥ २५६ ॥
ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पंडुसुता । जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें ॥ २५७ ॥
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं । सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती ॥ २५८ ॥

No comments:
Post a Comment