अध्याय १३ : ओव्या १-७

३१  मे  २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक १  /ज्ञानेश्वरी ओव्या १-७  )


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ त्रयोदशोऽध्यायः - अध्याय तेरावा । ।
। क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ।


आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण । तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥ १ ॥
जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे । सारस्वत आघवें । जिव्हेसि ये ॥ २ ॥
वक्तृत्वा गोडपणें । अमृतातें पारुखें म्हणे । रस होती वोळंगणें । अक्शरांसी ॥ ३ ॥
भावाचें अवतरण । अवतरविती खूण । हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद ॥ ४ ॥
श्रीगुरूंचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय । तैं येवढें भाग्य होय । उन्मेखासी ॥ ५ ॥
ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता । लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे ॥ ६ ॥


श्रीभगवानुवाच ।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते । एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥



तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे । जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099