२२ नोव्हेंबर २०२० निरुपण
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ ५॥
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥ १३८ ॥
येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम । तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥ १३९ ॥
हें एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं । वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥ १४० ॥
कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे । तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥ १४१ ॥
पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें । सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥ १४२ ॥
तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥ १४३ ॥
अर्जुना गा जाण । ययां नाम गुण । आतां दाखऊं खूण । बांधिती ते ॥ १४४ ॥
तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ॥ १४५ ॥
आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं । ममत्वाची सूती । घे ना जंव ॥ १४६ ॥
जैसी मीनाच्या तोंडीं । पडेना जंव उंडी । तंव गळ आसुडी । जळपारधी ॥ १४७ ॥
तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् । सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥ ६॥
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥ १४८ ॥
मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा ॥ १४९ ॥
तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे । मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥ १५० ॥
म्हणे भाग्य ना माझें ? । आजि सुखियें नाहीं दुजें । विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि ॥ १५१ ॥
आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें । जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं ॥ १५२ ॥
आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे । कीं विषयज्ञानें होये । गगनायेवढा ॥ १५३ ॥
रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं । तो दों दाणां मानी । इंद्रु ना मी ॥ १५४ ॥
तैसें गा देहातीता । जालेया देहवंता । हों लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें ॥ १५५ ॥
प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे । किंबहुना सुझे । स्वर्गवरी ॥ १५६ ॥
आणि म्हणे आजि आन । मीवांचूनि नाहीं सज्ञान । चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें ॥ १५७ ॥
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कानी । बैलाची करी वानी । पांगुळाचिया ॥ १५८ ॥
आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी । बांधिजे तें अवधारीं । सांगिजैल ॥ १५९ ॥
रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंगसमुद्भवम् । तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम् ॥ ७॥
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे । हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा ॥ १६० ॥
हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाच्या मदीं लागे । मग वारया वळघे । तृष्णेचिया ॥ १६१ ॥
घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें । आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ? ॥ १६२ ॥
तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड । इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे ॥ १६३ ॥
तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया । तर्ही म्हणे एखादिया । दारुणा वळघो ॥ १६४ ॥
जीविताचि कुरोंडी । वोवाळूं लागे कवडी । मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता ॥ १६५ ॥
आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल । ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी ॥ १६६ ॥
म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें । इयालागीं धांवें । याग करूं ॥ १६७ ॥
व्रतापाठीं व्रतें । आचरें इष्टापूर्तें । काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं ॥ १६८ ॥
पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसांवो नेणें वीरा । तैसा न म्हणे व्यापारा । रात्रदिवस ॥ १६९ ॥
काय चंचळु मासा ? । कामिनीकटाक्षु जैसा । वलाहो तैसा । विजूही नाहीं ॥ १७० ॥
तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें । आगीमाजीं रिगे । क्रियांचिये ॥ १७१ ॥
ऐसा देहीं देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा । खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा ॥ १७२ ॥
हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन । परिस आतां विंदाण । तमाचें तें ॥ १७३ ॥
तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनाम् । प्रमादालस्यनिद्राभिस्तन्निबध्नाति भारत ॥ ८॥
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें । मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें ॥ १७४ ॥
अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें । जेणें विश्व भुललें । नाचत असे ॥ १७५ ॥
अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र । हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें ॥ १७६ ॥
पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म । चौखुरी देहात्म- । मानियातें ॥ १७७ ॥
हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं । आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं ॥ १७८ ॥
सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य । माल्हाती जे दार्ढ्य । आलस्याचें ॥ १७९ ॥
आंगें आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी । नुसती परवडी । जांभयांची ॥ १८० ॥
उघडियाची दिठी । देखणें नाहीं किरीटी । नाळवितांचि उठी । वो म्हणौनि ॥ १८१ ॥
पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी । तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें ॥ १८२ ॥
पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो । परी उठणें हा भावो । उपजों नेणें ॥ १८३ ॥
उचितानुचित आघवें । झांसुरता नाठवे जीवें । जेथींचा तेथ लोळावें । ऐसी मेधा ॥ १८४ ॥
उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें । पायाचें शिरियाळें । मांडूं लागे ॥ १८५ ॥
आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु । झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे ॥ १८६ ॥
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे । हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं ॥ १८७ ॥
कां वाटें जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे । अमृतही परी नेघे । जरी नीद आली ॥ १८८ ॥
तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे । निगालें तरी आंधळें । रोषें जैसें ॥ १८९ ॥
केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें । हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें ॥ १९० ॥
वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा । पतंगु पां हांवा । घाली जेवीं ॥ १९१ ॥
तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा ।किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे ॥ १९२ ॥
एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिबंधीं । बांधे निरुपाधी । चोखटातें ॥ १९३ ॥
जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें । व्योम घटें आवरे । तें घटाकाश ॥ १९४ ॥
नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें । तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे ॥ १९५ ॥

No comments:
Post a Comment