२८ मार्च २०२१ निरुपण
अध्याय १६ : । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक १ / ज्ञानेश्वरी ओव्या ७४ - १०५ )
आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे । तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी ॥ ७४ ॥
कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे । माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे ॥ ७५ ॥
नातरी वार्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली । माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी ॥ ७६ ॥
तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी । भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे ॥ ७७ ॥
इंद्रियवर्गीं दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया । विस्मयो कांहीं केलिया । नुठी चित्तीं ॥ ७८ ॥
गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु । भलतेसणी हानिलाभु । न मनीं जेवीं ॥ ७९ ॥
तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें । ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥ ८० ॥
आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं । जे आपुलिया ठाकी । हांवें भरे ॥ ८१ ॥
तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें या रीती । निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी ॥ ८२ ॥
कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली । हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी ॥ ८३ ॥
तैसे निर्विकल्पपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें । तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु ॥ ८४ ॥
आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें । वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां ॥ ८५ ॥
पत्र पुष्प छाया । फळें मूळ धनंजया । वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा ॥ ८६ ॥
तैसें मनौनि धनधान्यवरी । विद्यमानें आल्या अवसरीं । श्रांताचिये मनोहारीं । उपयोगा जाणें ॥ ८७ ॥
तयां नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन । हें असो आइक चिन्ह । दमाचें तें ॥ ८८ ॥
तरी विषयेंद्रियां मिळणी । करूनि घापे वितुटणी । जैसें तोडिजे खड्गपाणी । पारकेया ॥ ८९ ॥
तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां । इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी ॥ ९० ॥
आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी । आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची ॥ ९१ ॥
श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें । वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया ॥ ९२ ॥
पैं दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें । यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक ॥ ९३ ॥
तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे । माझारीं अधिकारें । आपुलालेनि ॥ ९४ ॥
जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म । ते तेणें यथागम । विधी यजिजे ॥ ९५ ॥
जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी । कीं दोहींसही सरोभरी । निपजे यागु ॥ ९६ ॥
तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें । परी विषय विष फळाशेचें । न घापे माजीं ॥ ९७ ॥
आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों । ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वयें ॥ ९८ ॥
अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु । कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा ॥ ९९ ॥
आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे । कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष ॥ १०० ॥
नातरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया । कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
हें बहु असो आरिसा । आपणपें देखावया जैसा । पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती ॥ १०२ ॥
तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु । श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें ॥ १०३ ॥
तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र । आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व ॥ १०४ ॥
पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो । आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों ॥ १०५ ॥

No comments:
Post a Comment