१६ डिसेंबर २०१८ निरुपण
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग (गीता श्लोक ८-१६/ ज्ञानेश्वरी ओव्या ३३-१०२)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८॥
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ । जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ॥ ९॥
म्हणौनि उदकीं रसु । कां पवनीं जो स्पर्शु । शशिसूर्यीं जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥ ३३ ॥
तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीच्या ठायीं गंधु । गगनीं मी शब्दु । वेदीं प्रणवु ॥ ३४ ॥
नराच्या ठायीं नरत्व । जें अहंभाविये सत्त्व । तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ॥ ३५ ॥
अग्नि ऐसें आहाच । तेज नामाचें आहे कवच । तें परतें केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥
आणि नानाविध योनी । जन्मोनि भूतें त्रिभुवनीं । वर्तत आहाति जीवनीं । आपुलाल्या ॥ ३७ ॥
एकें पवनेंचि पिती । एकें तृणास्तव जिती । एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३८ ॥
ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन । तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९ ॥

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् । बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ॥ १०॥
बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् । धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११॥
पैं आदिचेनि अवसरें । विरूढे गगनाचेनि अंकुरें । जे अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपीठींचीं ॥ ४० ॥
जंव हा विश्वाकारु असे । तंव जें विश्वाचिसारिखें दिसे । मग महाप्रळयदशे । कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥
ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्वबीज । हें हातातळीं तुज । देइजत असे ॥ ४२ ॥
मग उघड करूनि पांडवा । जैं हे आणिसील सांख्याचिया गांवा । तैं ययाचा उपेगु बरवा । देखशील ॥ ४३ ॥
परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । जाण तपियांच्या ठायीं तप । तें रूप माझें ॥ ४४ ॥
बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ । बुद्धिमंतीं केवळ । बुद्धि तें मी ॥ ४५ ॥
भूतांच्या ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु । जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥
एर्हवीं विकाराचेनि पैसे । करी कीर इंद्रियांचि ऐसें । परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥
जो अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥ ४८ ॥
कामु ऐसिया वोजा प्रवर्ते । म्हणौनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ॥ ४९ ॥
जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके ॥ ५० ॥
ऐसा नियुत कां कंदर्पु । जो भूतां या बीजरूपु । तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥ ५१ ॥
हें एकेक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें । मजपासूनि जाणावें । विकारलें असे ॥ ५२ ॥

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये । मत्त एवेति तान्विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२॥
जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व । तें ममरूपसंभव । वोळखें तूं ॥ ५३ ॥
हे जाले तरी माझ्या ठायीं । परी तयामाजीं मी नाहीं । जैसी स्वप्नींच्या डोहीं । जागृति न बुडे ॥ ५४ ॥
जैसी रसाचीच सुघट । बीजकणिका घनवट । परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥
मग तया काष्ठाच्या ठायीं । सांग पां बीजपण असे काई ? । तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसे ॥ ५६ ॥
पैं गगनीं उपजे आभाळ । परी तेथ गगन नाहीं केवळ । अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥
मग त्या उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे । तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ? ॥ ५८ ॥
सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नि आहे ? । तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असे ॥ ५९ ॥

त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् । मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३॥
परी उदकीं जाली बाबुळी । ते उदकातें जैसी झांकोळी । कां वायांचि आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥
हां गा स्वप्न लटिकें म्हणों ये । परि निद्रावशें बाणलें होये । तंव आठवु काय देत आहे । आपणपेयां ? ॥ ६१ ॥
हें असो डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे । तेणें देखणेंपण डोळ्यांचे । न गिळजे कायी ? ॥ ६२ ॥
तैसी हे माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली । कीं मजचि आड वोडवली । जवनिका जैसी ॥ ६३ ॥
म्हणौनि भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती । जैसी जळींचि जळीं न विरती । मुक्ताफळें ॥ ६४ ॥
पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एर्हवीं तोचि अग्निसंगें सिजे । तरी वेगळा होय ॥ ६५ ॥
तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगें जीव- । दशे आले ॥ ६६ ॥
म्हणौनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध जाले ॥ ६७ ॥

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४॥
आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होईजे हें आया । कैसेनि ये ? ॥ ६८ ॥
जिये ब्रह्माचळाचा आधाडा । पहिलिया संकल्पजळाचा उभडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥ ६९ ॥
जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें । चढत काळकळनेचेनि वेगें । प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥
जे गुणघनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें । घेऊनि जात नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥
जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत । मत्सराचे वळसे पडत । माजीं प्रमादादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥
जेथ प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें । वरी तरताती वोसाणें । सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥
रतीचिया बेटा । आदळती कामाचिया लाटा । जेथ जीवफेन संघटा । सैंघ दिसे ॥ ७४ ॥
अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती ॥ ७५ ॥
उदयास्ताचे लोंढे । पाडीत जन्ममरणाचे चोंढे । जेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥ ७६ ॥
सम्मोह विभ्रम मासे । गिळिताती धैर्याचीं आविसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥ ७७ ॥
भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥
तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥ ७९ ॥
पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंबती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥
तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें । ऐसा मायापूर हा कवणें । तरिजेल गा ? ॥ ८१ ॥
येथ एक नवलावो । जो जो कीजे तरणोपावो । तो तो अपावो । होय तें एक ॥ ८२ ॥
एक स्वयंबुद्धीच्या बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं । एक जाणिवेचे डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥
एकीं वेदत्रयाचिया सांगडी । घेतल्या अहंभावाचिया धोंडी । ते मदमीनाच्या तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥
एकीं वयसेचें जाड बांधले । मग मन्मथाचिये कांसे लागले । ते विषयमगरीं सांडिले । चघळूनियां ॥ ८५ ॥
आतां वार्धक्याच्या तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा । तेणें कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥ ८६ ॥
आणि शोकाचा कडा उपडत । क्रोधाच्या आवर्तीं दाटत । आपदागिधीं चुंबिजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥
मग दुःखाचेनि बरबटें बोंबले । पाठीं मरणाचिये रेवे रेवले । ऐसे कामाचे कांसे लागले । ते गेले वायां ॥ ८८ ॥
एकीं यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं । ते स्वर्गसुखाच्या कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥
एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा । परी ते पडिले वळसां । विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥
जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे । वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपाय तो ॥ ९१ ॥
ऐसें तरी जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें तरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥ ९२ ॥
जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥ ९३ ॥
जरी चोरां सभा दाटे । अथवा मीनां गळु घोटे । ना तरी भेडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥
पाडस वागुर करांडी । कां मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥
म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तेवीं मायामय हे सरिता । न तरवें जीवां ॥ ९६ ॥
येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।तयां ऐलीच थडी सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥
जयां सद्गुरुतारूं फुडें । जे अनुभवाचे कांसे गाढे । जयां आत्मनिवेदन तरांडे । आकळलें ॥ ९८ ॥
जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झुळका चुकाउनी । अनुरागाचा निरुता हौनि । पाणिढाळु ॥ ९९ ॥
जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा । मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥
ते उपरतीच्या वांवीं सेलत । सोऽहंभावाचेनि थावें पेलत । मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १०१ ॥
येणें उपायें मज भजले । ते हे माझी माया तरले । परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥ १०२ ॥

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५॥
चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६॥
जे बहुतां एकां अव्हांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणौनि विसरु । आत्मबोधाचा ॥ १०३ ॥
ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करिताति जें न करावें । वेदु म्हणे ॥ १०४ ॥
पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥ १०५ ॥
इंद्रियग्रामींचे राजबिदीं । अहंममतेचिया जल्पवादीं । विकारांतरांचि मांदीं । मेळवूनियां ॥ १०६ ॥
दुःखशोकांच्या घाईं । मारिलियाची सेचि नाहीं । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥
म्हणौनि ते मातें चुकले । ऐका चतुर्विध मज भजले । जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ १०८ ॥
तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे । तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७॥
तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे । तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥
मग चौथियाच्या ठायीं । कांहींचि करणें नाहीं । म्हणौनि भक्तु एकु पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥
जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कडवसें । मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥
परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥ ११३ ॥
जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेवीं भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥
जरी पवनु हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । एर्हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ ११५ ॥
तैसें शरीरीं हन कर्में । तो भक्तु ऐसा गमे । परी अंतरप्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥ ११६ ॥
आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणें । म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥ ११७ ॥
हां गा जीवापैलीकडिलीये खुणे । जो पावोनि वावरों जाणें । तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ? ॥ ११८ ॥

No comments:
Post a Comment