२० एप्रिल २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक ५ आणि ६ / ज्ञानेश्वरी ओव्या ७१-९७)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५॥
आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों । तरी मजमाजीं भूतें हेंही वावो । जें मी सर्व म्हणौनी ॥ ७१ ॥
एर्हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणौनि अखंडितचि परि झांवळे । भूतभिन्न ऐसें देखे ॥ ७२ ॥
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरूपें । जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥
एर्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयाचे निघती कोंभ ? । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥
नातरी सागरींच्या पाणी । काय तरंगाचिया आहाती खाणी ? । ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ? ॥ ७५ ॥
पाहें पां कापसाच्या पोटीं । काय कापडाची होती पेटी ? ।तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥
जरी सोनें लेणें हौनी घडे । तरी तयाचें सोनेंपण न मोडे । येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करें । तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ? ॥ ७८ ॥
तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी । तयासी तयाच्या संकल्पीं । भूताभासु असे ॥ ७९ ॥
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । तरि भूताभासु आधींचि सरे । मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥
हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं । हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
आतां मीच एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजीं मी असता । या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा । जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हे तेंचि मृगजळ आभासे । माझ्या ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंहीं भावी ॥ ८५ ॥
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु । जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु ? । आतां सांगे कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ? ॥ ८७ ॥
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें । आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो! ॥ ८८ ॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् । तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६॥

पैं गगन जेवढें जैसें । पवनुहि गगनीं तेवढाचि असे । सहजें हालविलिया वेगळा दिसे । एर्हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥
तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥ ९० ॥
म्हणौनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें । जें कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥
तेंचि कल्पितें मुद्दल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे ? । म्हणौनि पुढती तूं पाहे । हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥ ९३ ॥
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना ? म्हणती देवो । तरी आतां द्वैत स्वप्न वावो । जालें कीं ना ? ॥ ९४ ॥
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसी कल्पनेची झोंप ये । तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥
म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे । ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥ ९६ ॥
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया । पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥

No comments:
Post a Comment