५ डिसेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः । ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् ॥ ५५॥
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज । मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे ॥ ११३० ॥
जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा । हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं ॥ ११३१ ॥
ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया । उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली ॥ ११३२ ॥
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती । आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो ॥ ११३३ ॥
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे । मग समस्तही निखिळें । मियांचि भरे ॥ ११३४ ॥
तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं । वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय ॥ ११३५ ॥
घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें । गिळूनि चाऱ्ही भूतें । आकाश जैसें ॥ ११३६ ॥
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध । तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें ॥ ११३७ ॥
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा । तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो ॥ ११३८ ॥
कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा । देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये ॥ ११३९ ॥
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया । देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं ॥ ११४० ॥
चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे । ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का ॥ ११४१ ॥
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा । तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे ॥ ११४२ ॥
तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी । कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं ॥ ११४३ ॥
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? । कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ? ॥ ११४४ ॥
आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? ।रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ? ॥ ११४५ ॥
म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं । मग भजेल हें कायी । बोलों कीर ॥ ११४६ ॥
यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी । तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी ॥ ११४७ ॥
तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं । नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा ॥ ११४८ ॥
तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे । अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं ॥ ११४९ ॥
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी । का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते ॥ ११५० ॥
तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोला{ऐ}सें ॥ ११५१ ॥
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे । तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि ॥ ११५२ ॥
बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे । तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें ॥ ११५३ ॥
म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां । मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें ॥ ११५४ ॥
तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी । तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी ॥ ११५५ ॥
आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ । तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें ॥ ११५६ ॥
दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे । तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही ॥ ११५७ ॥
तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया । ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें ॥ ११५८ ॥
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\- । माजीं वन्हि एक उठी । तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय ॥ ११५९ ॥
नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती । बिंबताही असती । जाय जैसी ॥ ११६० ॥
तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें । तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं ॥ ११६१ ॥
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता । तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया ॥ ११६२ ॥
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे । ते तें दर्शन माझें । साचोकारें ॥ ११६३ ॥
तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी । द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा ॥ ११६४ ॥
आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें । मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया ॥ ११६५ ॥
कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके । तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो ॥ ११६६ ॥
पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? । आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ? ॥ ११६७ ॥
म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें । तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज ॥ ११६८ ॥
पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु । तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें ॥ ११६९ ॥
जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें । तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां ॥ ११७० ॥
गेलियाही भलतेउता । उदकपणेंं पंडुसुता । तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं ॥ ११७१ ॥
तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला । या यात्रा होय भला । कापडी माझा ॥ ११७२ ॥
आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे । तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया ॥ ११७३ ॥
तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता । मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय ॥ ११७४ ॥
पैं दर्पणातेंं दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें । सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं ॥ ११७५ ॥
दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे । तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये । तैं न करणेंचि होये । तयाचें केलें ॥ ११७७ ॥
क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें । तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें ॥ ११७८ ॥
म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा । निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें ॥ ११७९ ॥
एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन । अद्वया मज गमन । तो चाले तेंचि ॥ ११८० ॥
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा । तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी ॥ ११८१ ॥
जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें । तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा ॥ ११८२ ॥
उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु । रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा ॥ ११८३ ॥
किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु । तैसा तो एकवटु । मजसीं माझा ॥ ११८४ ॥
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं । मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण ॥ ११८५ ॥
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें । भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें ॥ ११८६ ॥
तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा । अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे ॥ ११८७ ॥
रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु । रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं ॥ ११८८ ॥
भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं । हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे ॥ ११८९ ॥
उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें । जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं ॥ ११९० ॥
नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां । तो आपणयापरौता । न दिसे जैसा ॥ ११९१ ॥
तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती । तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी ॥ ११९२ ॥
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु । अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु । आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु । अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु । सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु । स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु । व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु । समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें । आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२०० ॥
पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे । तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥ १२०१ ॥
कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु । तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा ॥ १२०२ ॥
तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं । तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे ॥ १२०३ ॥
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया । ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये ॥ १२०४ ॥
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत । हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे ॥ १२०५ ॥
तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण । तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं ॥ १२०६ ॥
कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं । नाटितां होय आटणी । अळंकाराचीही ॥ १२०७ ॥
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे । तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें ॥ १२०८ ॥
तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें । कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं ॥ १२०९ ॥
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे । ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं ॥ १२१० ॥
जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी । मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं ॥ १२११ ॥
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी ॥ १२१२ ॥
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु । न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ ॥ १२१३ ॥
न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी । जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें ॥ १२१४ ॥
तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंंदु घेपे आनंदें । सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे ॥ १२१५ ॥
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा । विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं ॥ १२१६ ॥
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला । अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें ॥ १२१७ ॥
किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ । सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते ॥ १२१८ ॥
पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं । मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा ॥ १२१९ ॥
कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा । तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो ॥ १२२० ॥
नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी । जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे ॥ १२२१ ॥
हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें । मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा ॥ १२२२ ॥
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा । म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही ॥ १२२३ ॥
पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें । तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही ॥ १२२४ ॥
म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं । मी लाभें इयें उपायीं । साचचि गा ॥ १२२५ ॥
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥ १२२६ ॥
अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी । वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध ॥ १२२७ ॥
परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें । येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी ॥ १२२८ ॥
हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो । हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा ॥ १२२९ ॥
जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें । आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध ॥ १२३० ॥
वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी । कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी ॥ १२३१ ॥
तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु । तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें ॥ १२३२ ॥
म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें । वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं ॥ १२३३ ॥
तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी । तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता ॥ १२३४ ॥
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया । तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें ॥ १२३५ ॥
हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें । सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा ॥ १२३६ ॥
परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे । हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी ॥ १२३७ ॥
तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ । सांगतसे मुकुल । मुद्रा आतां ॥ १२३८ ॥
आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता । म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व ॥ १२३९ ॥
जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं । निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें ॥ १२४० ॥
तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत । हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी ॥ १२४१ ॥
तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका । भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे ॥ १२४२ ॥
एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ । या दोहीं केवळ । साधन ज्ञान ॥ १२४३ ॥
हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं । तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें ॥ १२४४ ॥
म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती । देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें ॥ १२४५ ॥

No comments:
Post a Comment