२४ नोव्हेंबर २०१९ निरुपण
अध्याय ११ : विश्वरूपदर्शनयोगः (गीता श्लोक १७-२१ / ज्ञानेश्वरी ओव्या २९४-३३१ )
आज ज्ञानोबरायांना संजीवन समाधी घेऊन ७२३ वर्षे झाली. ह्या समाधीचे वर्णन नामदेव महाराजांनी काही अभंगांतून केले आहे. त्याचेही निरूपण आज झाले ते खालील रेकॉर्डिंग लिंकवर ऐकता येईल.
भगवंत ज्ञानोबरायांना म्हणतात, " माउलींनी काहीतरी मागव"
ज्ञानोबराय म्हणतात, " देवा मी तुला निराश करत नाही म्हणून मागितला मान ज्ञानोबराय
फक्त एक शुद्ध वारी तुझ्याकडे आहे आणि फक्त दर वद्य वारीला माझ्याकडे ये मला भेटायला असे शेवटचे मागणे ज्ञानोबराय मागतात . ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा

कार्तिक वद्य त्रयोदशी (गुरुवार) 25 ऑक्टोबर 1296 रोजी *योगसम्राट ज्ञानसम्राट भगवान श्री ज्ञानोबराय संजीवन समाधीला बसतात* आणि शेवटचे शब्द ज्ञानोबरायांसाठी नामदेव महाराज म्हणतात,
नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप समाधिस्त ज्ञानेश्वर
११ व्या अध्यायाच्या २९४ ते ३३१ ओव्यांचे आणि समाधीच्या प्रसंग वर्णानाचे निरूपण
आज ज्ञानोबरायांना संजीवन समाधी घेऊन ७२३ वर्षे झाली. ह्या समाधीचे वर्णन नामदेव महाराजांनी काही अभंगांतून केले आहे. त्याचेही निरूपण आज झाले ते वरील रेकॉर्डिंग लिंकवर ऐकता येईल.
भगवंत ज्ञानोबरायांना म्हणतात, " माउलींनी काहीतरी मागव"
ज्ञानोबराय म्हणतात, " देवा मी तुला निराश करत नाही म्हणून मागितला मान ज्ञानोबराय
फक्त एक शुद्ध वारी तुझ्याकडे आहे आणि फक्त दर वद्य वारीला माझ्याकडे ये मला भेटायला असे शेवटचे मागणे ज्ञानोबराय मागतात . ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा
कार्तिक वद्य त्रयोदशी (गुरुवार) 25 ऑक्टोबर 1296 रोजी *योगसम्राट ज्ञानसम्राट भगवान श्री ज्ञानोबराय संजीवन समाधीला बसतात* आणि शेवटचे शब्द ज्ञानोबरायांसाठी नामदेव महाराज म्हणतात,
नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप समाधिस्त ज्ञानेश्वर
११ व्या अध्यायाच्या २९४ ते ३३१ ओव्यांचे आणि समाधीच्या प्रसंग वर्णानाचे निरूपण
किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तम् । पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम् ॥ १७॥
नोहे तोचि हा शिरीं ? । मुकुट लेइलासि श्रीहरी । परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें ॥ २९४ ॥
तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती । सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण ॥ २९५ ॥
येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा । वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया ॥ २९६ ॥
आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा । जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें ॥ २९७ ॥
परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज । चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें ॥ २९८ ॥
हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं । नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ ॥ २९९ ॥
एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत । ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया ॥ ३०० ॥
हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी । कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन ॥ ३०१ ॥
नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां । आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना ॥ ३०२ ॥
उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु । पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां ॥ ३०३ ॥
हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु । तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा ॥ ३०४ ॥
तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे । पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती ॥ ३०५ ॥
ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी । नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये ॥ ३०६ ॥
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम् । त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर । श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥
जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान । तें अव्यय तूं गहन । अविनाश जी ॥ ३०८ ॥
तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा । जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं ॥ ३०९ ॥

अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम् । पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९॥
तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु । विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं ॥ ३१० ॥
पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा । एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी ॥ ३११ ॥
जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें । पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥
वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत । तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे ॥ ३१३ ॥
इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा । विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे ॥ ३१४ ॥
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः । दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २०॥

कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ । अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र ॥ ३१५ ॥
हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें । परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं । तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ? ॥ ३१७ ॥
नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण । सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे ॥ ३१८ ॥
देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें । आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥
एर्हवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ? । परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥
जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें । आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु ॥ ३२१ ॥
तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी । आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं ? ॥ ३२२ ॥
म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु । आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों ॥ ३२३ ॥
ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा । हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज ॥ ३२४ ॥
जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं । तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे ॥ ३२५ ॥
तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें । यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे ॥ ३२६ ॥

अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति । स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१॥
हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें । मिळत तुज आंतु सहजें । सद्भावेसीं ॥ ३२७ ॥
आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु । तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां ॥ ३२८ ॥
देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों । स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं ॥ ३२९ ॥
ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ? । तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा ॥ ३३० ॥
आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध । हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन ॥ ३३१ ॥

No comments:
Post a Comment