१७ फेब्रुवारी २०२० निरुपण
अध्याय १२ : भक्तीयोगः ( ज्ञानेश्वरी ओव्या ४-१९)
काही कारणाने ह्या भागाचे निरुपण रेकॉर्डिंग झालेले नाही.
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं । हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं । आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी । समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं । या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी । तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥
म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते । आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥
नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचे आगरु । भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥ ११ ॥
साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं । विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ ॥ १२ ॥
संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें । लावीं म्हणे गहनें । निरंतर ॥ १३ ॥
पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे । कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥ १४ ॥
श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें । राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥ १५ ॥
ये मर्हाठियेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं । घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥ १६ ॥
तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें । तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥ १७ ॥
इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी । म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥
तेथ जी जी महाप्रसादु । म्हणौनि साविया जाहला आनन्दु । आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥ १९ ॥
No comments:
Post a Comment