२ डिसेंबर २०१८ निरुपण
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग (गीता श्लोक १-६ / ज्ञानेश्वरी ओव्या १-२८)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ सप्तमोऽध्यायः – अध्याय सातवा । ।
। ज्ञानविज्ञानयोगः ।
श्रीभगवानुवाच ।
मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः । असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १॥
ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः । यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते ॥ २॥
आइका मग तो श्रीअनंतु । पार्थातें असे म्हणतु । पैं गा तूं योगयुक्तु । जालासि आतां ॥१ ॥
मज समग्रातें जाणसी ऐसें । आपुलिया तळहातींचें रत्न जैसें । तुज ज्ञान सांगेन तैसें । विज्ञानेंसीं ॥ २ ॥
एथ विज्ञानें काय करावें । ऐसें घेसी जरी मनोभावें । तरी पैं आधीं जाणावें । तेंचि लागे ॥ ३ ॥
मग ज्ञानाचिये वेळे । झांकती जाणिवेचे डोळे । जैसी तीरीं नाव न ढळे । टेकलीसांती ॥ ४ ॥
तैसी जाणीव जेथ न रिघे । विचार मागुता पाउलीं निघे । तर्कु आयणी नेघे । आंगीं जयांच्या ॥ ५ ॥
अर्जुना तया नांव ज्ञान । येर प्रपंचु हें विज्ञान । तेथ सत्यबुद्धि तें अज्ञान । हेंही जाण ॥ ६ ॥
आतां अज्ञान अवघें हरपे । विज्ञान निःशेष करपे । आणि ज्ञान तें स्वरूपें । होऊनि जाइजे ॥ ७ ॥
जेणें सांगतयाचें बोलणें खुंटे । ऐकतयाचें व्यसन तुटे । हें जाणणें सानें मोठें । उरों नेदी ॥ ८ ॥
ऐसें वर्म जें गूढ । तें किजेल वाक्यारूढ । जेणें थोडेन पुरे कोड । बहुत मनींचें ॥ ९ ॥
मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः ॥ ३॥

पैं गा मनुष्यांचिया सहस्रशां- माजी विपाइलेयाची धिंवसा। तैसें या धिंवसेकरां बहुवसां । माजीं विरळा जाणे ॥ १० ॥
जैसा भरलेया त्रिभुवना- । आंतु एकएकु चांगु अर्जुना । निवडूनि कीजे सेना । लक्षवरी ॥ ११ ॥
कीं तयाही पाठीं । जे वेळीं लोह मांसातें घांटी । ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं । एकुची बैसे ॥ १२ ॥
तैसें आस्थेच्या महापुरीं । रिघताती कोटिवरी । परी प्राप्तीच्या पैलतीरीं । विपाइला निगे ॥ १३ ॥
म्हणौनि सामान्य गा नोहे । हें सांगतां वडिल गोठी आहे । परी तें बोलों येईल पाहें । आता प्रस्तुत ऐकें ॥ १४ ॥
भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ॥ ४॥

तरी अवधारीं गा धनंजया । हे महदादिक माझी माया । जैसी प्रतिबिंबे छाया । निजांगाची ॥ १५ ॥
आणि इयेतें प्रकृति म्हणिजे । जे अष्टधा भिन्न जाणिजे । लोकत्रय निपजे । इयेस्तव ॥ १६ ॥
हे अष्टधा भिन्न कैसी । ऐसा ध्वनि धरिसी जरी मानसीं । तरी तेचि गा आतां परियेसीं । विवंचना ॥ १७ ॥
आप तेज गगन । मही मारुत मन । बुद्धि अहंकारु हे भिन्न । आठै भाग ॥ १८ ॥

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ॥ ५॥
या आठांची जे साम्यावस्था । ते माझी परम प्रकृति पार्था । तिये नाम व्यवस्था । जीवु ऐसी ॥ १९ ॥
जे जडातें जीववी । चेतनेतें चेतवी । मना करवीं मानवी । शोक मोहो ॥ २० ॥
पैं बुद्धीच्या अंगीं जाणणें । तें जिये जवळिकेचें करणें । जिया अहंकाराचेनि विंदाणें । जगचि धरिजे ॥ २१ ॥

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ॥ ६॥
ते सूक्ष्म प्रकृति कोडें । जैं स्थूळाचिया आंगा घडे । तैं भूतसृष्टीची पडे । टांकसाळ ॥ २२ ॥
चतुर्विध ठसा । उमटों लागे आपैसा । मोला तरी सरसा । परी थरचि आनान ॥ २३ ॥
होती चौयांशीं लक्ष थरा । येरा मिती नेणिजे भांडारा ।भरे आदिशून्याचा गाभारा । नाणेयांसी ॥ २४ ॥
ऐसें एकतुके पांचभौतिक । पडती बहुवस टांक ।मग तिये समृद्धीचे लेख । प्रकृतीचि धरी ॥ २५ ॥
जे आखूनि नाणें विस्तारी । पाठी तयाची आटणी करी ।माजीं कर्माकर्माचिया व्यवहारीं । प्रवर्तु दावी ॥ २६ ॥
हें रूपक परी असो । सांगों उघड जैसें परियेसों ।तरी नामरूपाचा अतिसो । प्रकृतीच कीजे ॥ २७ ॥
आणि प्रकृति तंव माझ्या ठायीं । बिंबे येथें आन नाहीं ।म्हणौनि आदि मध्य अवसान पाहीं । जगासि मी ॥ २८ ॥

No comments:
Post a Comment