अध्याय १३ : ओव्या १८४-२१७

२८  जून  २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ५-६ / ज्ञानेश्वरी ओव्या १८४-२१७   )


अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् । आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७॥


तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे । संभावितपणाचें । वोझे जया ॥ १८५ ॥
आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां । योग्यतेचें येतां । रूप आंगा ॥ १८६ ॥
तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा । कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं ॥ १८७ ॥
पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे । गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी ॥ १८८ ॥
पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी । हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥ १८९ ॥
तेथ सत्काराची कें गोठी । कें आदरा देईल भेटी । मरणेंसीं साटी । नमस्कारितां ॥ १९० ॥
वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे । परी वेडिवेमाजीं दडे । महमेभेणें ॥ १९१ ॥
चातुर्य लपवी । महत्त्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडोनि ॥ १९२ ॥
लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु । उगेपणीं चांगु । आथी भरु ॥ १९३ ॥
जगें अवज्ञाचि करावी । संबंधीं सोयचि न धरावी । ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु ॥ १९४ ॥
तळौटेपण बाणे । आंगीं हिणावो खेवणें । तें तेंचि करणें । बहुतकरुनी ॥ १९५ ॥
हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें । तैसें जिणें होआवें । ऐसी आशा ॥ १९६ ॥
पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे । जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे ॥ १९७ ॥
माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो । मज झणें वासिपो । भूतजात ॥ १९८ ॥
ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये । नामेंचि जो जिये । विजनाचेनि ॥ १९९ ॥
वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे । जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया ॥ २०० ॥
किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी । जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली ॥ २०१ ॥
पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं । आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों ॥ २०२ ॥
तरी अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें । जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो ॥ २०३ ॥
तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं । तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें ॥ २०४ ॥
खडाणें आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना । कां लपवी पण्यांगना । वडिलपण ॥ २०५ ॥
आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता जेवीं हारवी । नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें ॥ २०६ ॥
नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें । तैसें झांकी निपजलें । दानपुण्य ॥ २०७ ॥
वरिवरी देहो न पूजी । लोकांतें न रंजी । स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे ॥ २०८ ॥
परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें । न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं ॥ २०९ ॥
शरीर भोगाकडे । पाहतां कृपणु आवडे । एऱ्हवीं धर्मविषयीं थोडें । बहु न म्हणे ॥ २१० ॥
घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड । परी दानीं जया होड । सुरतरूसीं ॥ २११ ॥
किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु । आत्मचर्चे चतुरु । एऱ्हवी वेडा ॥ २१२ ॥
केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे । परी फळोनियां गाढें । रसाळ जैसें ॥ २१३ ॥
कां मेघांचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल । परी वर्षती नवल । घनवट तें ॥ २१४ ॥
तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी । एऱ्हवीं तरी वाणी । तोचि ठावो ॥ २१५ ॥
हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या । जाण ज्ञान तयाच्या । हातां चढें ॥ २१६ ॥
पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण । आतां आईक खूण । अहिंसेची ॥ २१७ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099