५ मे २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक १४-१५/ ज्ञानेश्वरी ओव्या १९७-२६४)
सततं किर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः । नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४॥अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक १४-१५/ ज्ञानेश्वरी ओव्या १९७-२६४)
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे । जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें । तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें । अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित । योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसणी करूं । एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥ २०२ ॥
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें । ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥ २०३ ॥
तेजें सूर्य तैसें सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ २०४ ॥
मेघ उदार परी वोसरे । म्हणौनि उपमेसी न पुरे । हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥ २०५ ॥
जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एकवेळ यावया ॥ २०६ ॥
तो मी वैकुंठीं नसें । वेळु एक भानुबिंबींही न दिसें । वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८ ॥
कैसे माझ्या गुणीं धाले । देशकालातें विसरले । कीर्तनें सुखी झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥
हे बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक विचरती चराचरीं । पंडुकुमरा ॥ २११ ॥
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राण मना । पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली । वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें । मन पवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचें पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥
तेव्हां प्रत्याहारें ख्याती केली । विकारांची सपिली बोहलीं । इंद्रियें बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥ २१५ ॥
तंव धारणावारु दाटिन्नले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥
तयावरी जैत रे जैत । म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा । पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥ २१८ ॥
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥
आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी । माजी समस्त हें जाणोनि । स्वरूप माझें ॥ २२१ ॥
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती । देखिलिये वस्तु उजू लुंटिती । मीचि म्हणौनि ॥ २२२ ॥
आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे । एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥
अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती । जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥ २२६ ॥
नमितां मानापमान गळाले । म्हणौनि अवचितां मीचि जहाले । ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती । आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी । जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
तंव आथि जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें ।तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ? ॥ २३० ॥
या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयांतें । कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥
म्हणे भलें केलें पार्था । एर्हवीं हा अनवसरु सर्वथा । परि बोलवितसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥
तंव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेंवीण चांदणेंचि नाहीं । जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे । तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
जी मेघु आपुलिये प्रौढी । जगाची आर्ती दवडी । वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ? ॥ २३५ ॥
परि चुळा एकाचिया चाडे । जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे । तेवीं आर्त बहु कां थोडे । तरी सांगावें देवें ॥ २३६ ॥
तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे । तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥
पैं परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्हाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥
तेथ मनबुद्धीचिया कुंडा । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदिका जाणें ॥ २४१ ॥
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्र विद्यागौरव । शांति स्रुक्-स्रुव । जीवु यज्वा ॥ २४२ ॥
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे ।आघवें एकचि ऐसें जाणें । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना । मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ? ॥ २४६ ॥
आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें । ऐसें एकत्वें मानवें । विश्व तयां ॥ २४७ ॥
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे । ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥
अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक । आणि नामरूपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥
म्हणौनि विश्व भिन्न । परि न भेदे तयाचें ज्ञान ।जैसे अवयव तरि आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥
कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
तेवीं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणौनि ॥ २५३ ॥
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तर्ही जळाचिमाजीं ॥ २५५ ॥
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ २५७ ॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयांची प्रतीती । ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि हौनि ॥ २५८ ॥
हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया । तैसे ते विश्वा यया । समोर सदा ॥ २५९ ॥
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥
एर्हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें ? । एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥
परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितलें ॥ २६३ ॥
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणें यासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥ २६४ ॥

No comments:
Post a Comment