१३ जानेवारी २०१९ निरुपण
अध्याय ७: ज्ञानविज्ञानयोग (गीता श्लोक १९-२१ / ज्ञानेश्वरी ओव्या १२७-१४४)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९॥
जे तो विषयांची दाट झाडी- । माजीं कामक्रोधांचीं सांकडीं । चुकावूनि आला पाडीं । सद्वासनेचिया ॥ १२७ ॥
मग साधुसंगें सुभटा । उजू सत्कर्माचिया वाटा । अप्रवृत्तीचा अव्हांटा । डावलूनि ॥ १२८ ॥
आणि जन्मशतांचा वाहतवणा । तेविंची आशेचिया न लेचि वाहणा । तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी ॥ १२९ ॥
ऐसा शरीरसंयोगाचिये राती- । माजीं धांवतां सडिया आयती । तंव कर्मक्षयाची पाहाती । पाहांट जाली ॥ १३० ॥
तैसीच गुरुकृपा उखा उजळली । ज्ञानाची वोतपली पडली । तेथ साम्याची ऋद्धि उघडली । तयाचिये दिठी ॥ १३१ ॥
ते वेळीं जयाकडे वास पाहे । तेउता मीचि तया एकु आहे । अथवा निवांत जरी राहे । तर्ही मीचि तया ॥ १३२ ॥
हें असो आणिक कांहीं । तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं । जैसें सबाह्य जळ डोहीं । बुडालिया घटा ॥ १३३ ॥
तैसा तो मजभीतरीं । मी तया आंतुबाहेरी । हें सांगिजेल बोलवरी । तैसें नव्हे ॥ १३४ ॥
म्हणौनि असो हें इयापरी । तो देखे ज्ञानाची वाखारी । तेणें संसरलेनि करी । आपु विश्व ॥ १३५ ॥
हें समस्तही श्रीवासुदेवो । ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो । म्हणौनि भक्तांमाजीं रावो । आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥
जयाचिये प्रतीतीचा वाखारां । पवाडु होय चराचरा । तो महात्मा धनुर्धरा । दुर्लभु आथी ॥ १३७ ॥
येर बहुत जोडती किरीटी । जयांचीं भजनें भोगासाठीं । जे आशातिमिरें दृष्टी । विषयांध जाले ॥ १३८ ॥

कामैस्तैस्तैर्हृज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः । तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २०॥
आणि फळाचिया हांवा । हृदयीं कामा जाला रिगावा । कीं तयाचिये घसणी दिवा । ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥
ऐसे उभयतां आंधारीं पडले । म्हणौनि पासींचि मातें चुकले । मग सर्वभावें अनुसरले । देवतांतरां ॥ १४० ॥
आधींच प्रकृतीचे पाइक । वरी भोगालागीं तंव रंक । मग तेणें लोलुपत्वें कौतुक । कैसेनि भजती ॥ १४१ ॥
कवणीं तिया नियमबुद्धि । कैसिया हन उपचारसमृद्धि । कां अर्पण यथाविधि । विहित करणें ॥ १४२ ॥

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१॥
पैं जो जिये देवतांतरीं । भजावयाची चाड करी । तयाची ते चाड पुरी । पुरविता मी ॥ १४३ ॥
देवोदेवीं मीचि पाहीं । हाही निश्चयो त्यासि नाहीं । भावो ते ते ठायीं । वेगळा धरिती ॥ १४४ ॥

No comments:
Post a Comment