स्वाध्याय १
जेव्हा त्यागेन हे शरिर,भगवंता करी इतुकेच,
तुझे तुलाच हे अर्पिता,न वाटो मना काही खंत ।।१।।
तमोगुणांंनी घेरलो,मी मायेमध्ये गुंतलो,
मूढ,अज्ञानी, आळशी,तव कृपा विसरलो ।।२।।
रजोगुणी बुडालो,अंध विषयात रमलो,
स्वार्थी बनून जगलो,अन् मी तुलाच अंतरलो ।।३।।
वर्षता तुझी कृपादृष्टी, जाग माझी मलाच यावी,
रजोतम कर्मवृत्ती,देवा निष्काम ही करावी ।।४।।
माझ्या कर्माची ही फळे,अर्पिता तुझ्या चरणाशी,
मम वृत्ती स्थिर करोनी,ओढ लावी रे ज्ञानाची ।।५।।
बोट धरोनी चालवी,करी सत्वगुणी प्रविष्ट,
तुझ्या साथीने चालता,सर्व होईलचि इष्ट ।।६।।
मी गुणातित होणे,हे जणूं पंगुचे गिरी उंलंघणे,
पण मनिषा धरूनिया राहे,तुझिया भरवसे ।।७।।
स्वाध्याय २
श्री गुरूदेव दत्त
प्रथम मी सबनीस कुटुंबाला आणि ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गातील सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार करते.
चौदावा अध्याय अभ्यासताना त्रिगुणाचा विचार केला आहे. आणि याही पलीकडे जाऊन त्रिगुणातीत व्हायचं आहे. यावर प्रकाश टाकला. पण हे सगळ मला थोडी जडचं वाटतयं. कारण हे सर्व शब्द खुप मोठे आणि बोलीभाषेतील वाटेनात ! या पूर्वी मी हा अध्याय बर्याच वेळा वाचला आहे. पण जेव्हा हा अध्याय अभ्यास वर्गात ऐकला तेव्हा तो खर्या अर्थाने थोडाफार समजला! आणि काही गोष्टी लक्षात येउ लागल्या.
सत्व रज तम हे तिन गुण आहेत, पण ते कसे काम करतात आणि आपल्या अध्यात्मिक उन्नती करता यात काय बदल हवा, पर्यायी त्या कश्या पार कराव्यात हा एक अभ्यासाचा विषय आहे. याची समज या अभ्यास वर्गात आली.
मला एवढचं माहिती होत की सत्व गुण हा उच्य प्रतिचा गुण आहे, आणि या गुणात ज्ञान होतं . रजोगुण लोभ वाढवणारा आहे या मूळे रजोगुणी सतत कर्मात रत असतो. आणि तमोगुणी आळशी, मंदगती, रागीट , कशाचाही ताळमेळ नसणारा असा अज्ञानी असतो. इतकी मोजकी माहिती!
या विषयावर अभ्यास चालू झाला आणि पूर्वी चे आपण, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केल्या वर हळूहळू च ,पण होणारा बदल या वर विचार सुरू झाला!
पूर्वी असे वाटे, की आपल्या मनाप्रमाणे काही घडतच नाही. जे हवं ते नाही मिळत. त्या मूळे सतत त्रासलेलीच अवस्था! घरातील संस्कर चांगलेच होते त्या मुळे वृत्ती वाईट नाही घडली. पण येणारे अनुभव, बसणारे धक्के या मूळे मन कधी कधी नाराज होत असे. कित्येकदा तर परमेश्वरा वर देखील राग आला आहे. चांगल्या मार्गावर च चालायचं आहे हे संस्काराने शिकवलं, त्यामुळे समाधानी वृत्ती येत असे पण टीकत नसे.
पण ज्ञानेश्वरी, गिता वाचन सुरू झाले, (समजत नसे काही) जिद्दीने चालू ठेवले आणि वृत्ती शांत होत जात आहे असा अनुभव येउ लागला. आजही मला फार काही उमजत नाही, पण सुरवातीला वाचायला बसलं की झोप येत असे कंटाळा येत असे ते खुप च कमी म्हणजे जवळजवळ बंदच झाले आहे!
वाचनाची ,अभ्यास वर्गाची वेळ होत आली की मन उल्हासित होत. त्या वेळी अचानक काम आलं तर थोडस वाईट ही वाटतं. आता अभ्यास वर्ग चालू झाला तस थोडे फार समजायला ही लागले त्यामुळे अजूनही जास्तच आनंद मिळतो!
बदल तर घडतो आहेच. आणि तो वरच्या पातळीवर सरकतो आहे असे नक्की च वाटतं. अगदी सुरवाती पासुन तमोगुणाच्या अधिपत्याखाली मी आहे असे नाही वाटत मला, पण सत्व गुणी मी आहे असे ही मला नाही वाटतं! मला रागही खुपसा नाही येत आणि मी नाराज ही नसते फारशी! खुप सारे टक्के टोणपे खाऊनही मी नैराश्य अवस्थेत नसते. अलीकडे मला कोणाकडून फारश्या अपेक्षा ही नसतात! काही बदल मी या वाचना मूळे, मुद्दाम जाणूनबुजून घडवून आणण्यासाठी प्रयत्न करते!
मी असं स्वतः ला बदलायच ठरवलं आहे . तक्रार आणि अपेक्षा अजीबात नाही करायची! जीथे गरज असेल तिथे आनंदाने मदत करायची, गरज नसेल तिथे अलिप्त राहायचे. ना सल्ला ना नाराजी.
या प्रयत्नांना यश ही येतय असं वाटतं! या मूळे खुप आनंद मिळतो. मला सगळेच बरोबर वाटतात. त्यामुळे तक्रार नाहीच!
मला वाटते सध्या मी रजोगुणात वर जाण्याच्या स्थितीत असावी! सतत मी कामात रमते. पण अजूनही कधीतरी आपल्या कामाचे कौतुक व्हावे असे वाटते मला! हे वाटणे कमी व्हायला हवं आणि निरपेक्ष कर्म व्हावे यासाठी मी प्रयत्न करती आहे. मी व्देष नाही करतं पण मला हवंपण ही कमी करायचं आहे. मला माझ्यात समभाव जागृत करायचा आहे. माझ्याकडून चूक झाली तर मी भगवंताकडे क्षमा मागते, चांगल्या घटनेचे आभार ही मी परमेश्वराचे मानते! तो जसा दिवस माझ्या करता ठरवतो तसा तो बिना तक्रार मी स्वीकारण्याचा मी जाणीवपूर्वक प्रयत्न करते. मी मागणं बंद करायच ठरवले आहे. अगदी परमेश्वराकडे ही काही मागायचे नाही तो जे देईल जसे देईल ते आनंदाने घ्यावं आणि त्याच्या सहवासात रहावं. तो सतत बरोबर आहे माझ्या, याची प्रचीती मला वारंवार येते. त्यामुळे मी सतत आनंदाने क्षण घालवते. या सार्या प्रयत्नाने आणि परमेश्वर कृपेने माझा सत्वगुणाकडे जाण्याचा प्रवास सुखकर होईल असे वाटते!
माझ्या छंदातून ही अलीकडे मी भगवंत पहाते असा अनुभव मी घेते आहे! मला गाणी ऐकण्याची खुप आवड आहे. मी भक्तीगीते ऐकते असही नाही पण जी गाणी ऐकते त्यात मला गुरू, कृष्ण दिसतो! उत्कृष्ट प्रेम गीत ही उच्च कोटी चे भक्ती गीत होताना मी अनुभवलं आहे!
उदाहरणार्थ, जो तुमको हो पसंद वही बात करेंगे,
तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे!
हे बहुतेकांना गाणी माहिती असेल. हे मला माझ्या गुरू करता म्हणावं वाटतं!
अशी अगदी अरजीत सिंग पर्यंत मी गाणी ऐकते की ज्यामुळे मला परमात्म्याची आठवण होते! त्यामुळे छंद जोपासत असता ही परमेश्वरा सोबत असल्याचा मला आनंद मिळतो!
No comments:
Post a Comment