अध्याय १४ : ओव्या २९३-३१९

१३ डिसेंबर  २०२० निरुपण 

अध्याय १४ : । गुणत्रयविभागयोगः । ( श्लोक २० / ज्ञानेश्वरी ओव्या  २९३-३१९ )


तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता । हे गुणचि क्रियाजातां । नियोजित ॥ २९३ ॥

सत्त्वरजतमांचा । भेदीं पसरु कर्माचा । होत असे तो गुणांचा । विकारु हा ॥ २९४ ॥
ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा ।वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत ॥ २९५ ॥
कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें । कमळीं विकासावें । जावें तमें ॥ २९६ ॥
ये कोणाचीं काजें कहीं । सवितिया जैसी नाहीं । तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप ॥ २९७ ॥
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे । ययाचेनि निःशेखें । उरे तें मी ॥ २९८ ॥
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया । ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें ॥ २९९ ॥

गुणानेतानतीत्य त्रीन्देही देहसमुद्भवान् । जन्ममृत्युजरादुःखैर्विमुक्तोऽमृतमश्नुते ॥ २०॥

आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक ।जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी ॥ ३०० ॥
किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता । पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा ॥ ३०१ ॥
नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला । तैसा मूळ अहंतें वेढिला । तो मी म्हणौनि ॥ ३०२ ॥
अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा । तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं ॥ ३०३ ॥
पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा । म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो ॥ ३०४ ॥
देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा । तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें ॥ ३०५ ॥
म्हणौनि मद्‍भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी । वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं ॥ ३०६ ॥
तेवीं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां । नागवे देहसंभूतां । गुणांसि तो ॥ ३०७ ॥
जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे । कां न विझेचि सागरें । वडवानळु ॥ ३०८ ॥
तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा । तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं ॥ ३०९ ॥
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं । तो पाहोंही न धाडी । अहंतेतें ॥ ३१० ॥
हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरीं । आतां काय वर्ते शरीरीं । हेंहीं नेणे ॥ ३११ ॥
सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें ॥ ३१२ ॥
कां सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा । माघारा कमळकोशा । नयेचि तो ॥ ३१३ ॥
पैं स्वरूपसमरसें । ऐक्य गा जालें तैसें । तेथ किं धर्म हें कैसें । नेणें देह ॥ ३१४ ॥
म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण । ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया ॥ ३१५ ॥
घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया । महदाकाश अपैसया । जालेंचि असे ॥ ३१६ ॥
तैसी देहबुद्धी जाये । जैं आपणपां आठौ होय । तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी ? ॥ ३१७ ॥
येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें । म्हणूनि तो मी म्हणें । गुणातीत ॥ ३१८ ॥
यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला । मेघें संबोखिला । मोरु जैसा ॥ ३१९ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099