अध्याय १३ : ओव्या ३६९ -४६०

५ जुलै २०२० निरुपण 
अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ७ / ज्ञानेश्वरी ओव्या ३६९ -४६० )


श्रीगुरूपौर्णिमेनिमित्त आज आचार्यपासन च्या ओव्या घेतल्या. 

आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥ ३६९ ॥
आघवियाचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेंहि ॥ ३७० ॥
हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥ ३७१ ॥
तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥ ३७२ ॥
नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥ ३७३ ॥
तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥ ३७४ ॥
गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥ ३७५ ॥
तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा । आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो ॥ ३७६ ॥
साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली । जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो ॥ ३७७ ॥
परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें । वांसरुवा लाविलें । दावें जैसें ॥ ३७८ ॥
म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल । युगाहूनि वडील । निमिष मानी ॥ ३७९ ॥
ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥ ३८० ॥
कां सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥ ३८१ ॥
नातरी रंकें निधान देखिलें । कां आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥ ३८२ ॥
तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥ ३८३ ॥
पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥ ३८४ ॥
आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
हृदयशुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी । मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय ॥ ३८६ ॥
कां चैतन्यांचिये पोवळी- । माजीं आनंदाचिया राउळीं । श्रिइगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत ॥ ३८७ ॥
उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका । भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे ॥ ३८८ ॥
काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं। न्यानदीपें वोंवाळी । निरंतर ॥ ३८९ ॥
सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय । आपण भराडा होय । गुरु तो लिंग ॥ ३९० ॥
नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे । ऐसीं प्रेमाचेनि भोजें । बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
कोणे{ए}के अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं । कीं तया नाम करी । क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख । वरी जलशयन देख । भावी गुरु ॥ ३९३ ॥
मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥ ३९४ ॥
नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥ ३९५ ॥
एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥ ३९६ ॥
नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥ ३९७ ॥
गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥ ३९८ ॥
गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन ॥ ३९९ ॥
चक्षुपक्षेवीण । पिलूं होय आपण । कैसें पैं अपारपण । आवडीचें ॥ ४०० ॥
गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी । गुरु तारू धरी । आपण कांस ॥ ४०१ ॥
ऐसें प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे । पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे ॥ ४०२ ॥
किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं । भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा ॥ ४०३ ॥
तरी जिवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥ ४०४ ॥
तैसिया साचा उपास्ती । गोसावी प्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करीन ॥ ४०५ ॥
म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुलें रूपें होआवा । मीचि एकु ॥ ४०६ ॥
आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं स्वामी ॥ ४०७ ॥
ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु । मग तो परिवारु । मीचि होईन ॥ ४०८ ॥
उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजैल ॥ ४०९ ॥
गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये । तैसें करूनि आण वायें । कृपे तिये ॥ ४१० ॥
तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं । क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरवीं ॥ ४११ ॥
चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघों बाहिरा । तैसा गुरुकृपें पांजिरा । मीचि होईन ॥ ४१२ ॥
आपुलिया गुणांचीं लेणीं । करीन गुरुसेवे स्वामिणी । हें असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी ॥ ४१३ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥ ४१४ ॥
म्हणे श्रीगुरूंचें भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥ ४१५ ॥
निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाळु ॥ ४१६ ॥
पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥ ४१७ ॥
मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥ ४१८ ॥
मीचि होईन सागळा । करूं सुईन गुरुळां । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥ ४१९ ॥
हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन । उळिग मी करीन । आंघोळीचें ॥ ४२० ॥
होईन गुरूंचें आसन । अलंकार परिधान । चंदनादि होईन । उपचार ते ॥ ४२१ ॥
मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु । आपणपें श्रीगुरु । वोंवाळीन ॥ ४२२ ॥
जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं । मीचि होईन पुढती । देईन विडा ॥ ४२३ ॥
ताट मी काढीन । सेज मी झाडीन । चरणसंवाहन । मीचि करीन ॥ ४२४ ॥
सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण । होईन पुरेपण । वोळगेचें ॥ ४२५ ॥
श्रीगुरूंचें मन । जया देईल अवधान । तें मी पुढां होईन । चमत्कारु ॥ ४२६ ॥
तया श्रवणाचे आंगणीं । होईन शब्दांचिया आक्षौहिणी । स्पर्श होईन घसणी । आंगाचिया ॥ ४२७ ॥
श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें । पाहाती तियें सकळें । होईन रूपें ॥ ४२८ ॥
तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजैल । गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा ॥ ४२९ ॥
एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त । वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां ॥ ४३० ॥
जंव देह हें असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल । मग देहांतीं नवल । बुद्धि आहे ॥ ४३१ ॥
इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती । जेथ श्रीचरण उभे ठाती । श्रीगुरूंचे ॥ ४३२ ॥
माझा स्वामी कवतिकें । स्पर्शीजति जियें उदकें । तेथ लया नेईन निकें । आपीं आप ॥ ४३३ ॥
श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिजती । तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा । मग आंगाचा वोळंगणा । होईन मी ॥ ४३५ ॥
जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं । आकाश लया आकाशीं । नेईन तिये ॥ ४३६ ॥
परी जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धाडीं । ऐसेनि गणावया कोडी । कल्पांचिया ॥ ४३७ ॥
येतुलेंवरी धिंवसा । जयाचिया मानसा । आणि करूनियांहि तैसा । अपारु जो ॥ ४३८ ॥
रात्र दिवस नेणे । थोडें बहु न म्हणें । म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय ॥ ४३९ ॥
तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे । एकला करी आघवें । एकेचि काळीं ॥ ४४० ॥
हृदयवृत्ती पुढां । आंगचि घे दवडा । काज करी होडा । मानसेंशीं ॥ ४४१ ॥
एकादियां वेळा । श्रीगुरुचिया खेळा । लोण करी सकळा । जीविताचें ॥ ४४२ ॥
जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु । गुरुआज्ञे निवासु । आपणचि जो ॥ ४४३ ॥
जो गुरु कुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु । जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर ॥ ४४४ ॥
गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम । गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचें गा ॥ ४४५ ॥
गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता । जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणें ॥ ४४६ ॥
श्रीगुरूचे द्वार । तें जयाचें सर्वस्व सार । गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे ॥ ४४७ ॥
जयाचें वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र । गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे ॥ ४४८ ॥
शिवतलें गुरुचरणीं । भलतैसें हो पाणी । तया सकळ तीर्थें आणी । त्रैलोक्यींचीं ॥ ४४९ ॥
श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें । तैं तेणें लाभें विटे । समाधीसी ॥ ४५० ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099