अध्याय १६ : ओव्या १४१-१८५

११  एप्रिल २०२१ निरुपण 

अध्याय १६ । दैवासुरसंपत्तिविभागयोगः । ( श्लोक २  / ज्ञानेश्वरी ओव्या १४१-१८५)


आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं । आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा ॥ १४१ ॥
का चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे । जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला ॥ १४२ ॥
नाना बुडतयातें सकरुणु । न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु । काढूनि राखे प्राणु । हेंचि जाणे ॥ १४३ ॥
कीं माय वनीं पापियें । उघडी केली विपायें । ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा ॥ १४४ ॥
तैसे अज्ञानप्रमादादिकीं । कां प्राक्तनहीन सदोखीं । निंदत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ॥ १४५ ॥
तयां आंगीक आपुलें । देऊनियां भलें । विसरविजती सलें । सलतीं तियें ॥ १४६ ॥
अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु । मग घापे अवलोकु । तयावरी ॥ १४७ ॥
जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे । तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा ॥ १४८ ॥
तैसें आपुलेनि गुणें । पुढिलाचें उणें । फेडुनियां पाहणें । तयाकडे ॥ १४९ ॥
वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं । न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं ॥ १५० ॥
वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये । तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ॥ १५१ ॥
पैं उत्तमाचियासाठीं । नीच मानिजे किरीटी । हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे ॥ १५२ ॥
अगा अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण । मोक्षमार्गींचें सुखासन । मुख्य हें गा ॥ १५३ ॥
आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निववितां न कडसी । सानें थोर ॥ १५४ ॥
तैसें दुःखिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें । उत्तमाधम नेणें । विवंचूं गा ॥ १५५ ॥
पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें । परी जातें जीवित राखे । तृणाचेंहि ॥ १५६ ॥
तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलिये कृपें । सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें । थोडेंचि गमे ॥ १५७ ॥
निम्न भरलियाविणें । पाणी ढळोंचि नेणे । तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरें पां ॥ १५८ ॥
पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे । तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि ॥ १५९ ॥
कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये । तैसा परसुखें जाये । सुखावतु ॥ १६० ॥
किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं । तैसें दुःखितांचे सेलभागीं । जिणें जयाचें ॥ १६१ ॥
तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभें ॥ १६२ ॥
आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें । परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें ॥ १६३ ॥
कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥ १६४ ॥
हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥ १६५ ॥
तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हें न रुचे । मनामाजीं ॥ १६६ ॥
बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्‍त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥ १६७ ॥
आतां माशियां जैसें मोहळ । जळचरां जेवीं जळ । कां पक्षियां अंतराळ । मोकळें हें ॥ १६८ ॥
नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें । कां वसंतीच्या स्पर्शें । मऊ मलयानिळु ॥ १६९ ॥
डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी । तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥ १७० ॥
स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु ।घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगें ॥ १७१ ॥
तो आवडे तेवढा घेतां । विरुद्ध जरी न होतां । तरी उपमे येता । कापूर कीं ॥ १७२ ॥
परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसें ॥ १७३ ॥
काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥ १७४ ॥
आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा । कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥ १७५ ॥
नाना चांडाळ मंदिराशीं । अवचटें आलिया संन्याशी । मग लाज होय जैसी । उत्तमा तया ॥ १७६ ॥
क्षत्रिया रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें । कां वैधव्यें पाचारणें । महासतियेतें ॥ १७७ ॥
रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट । तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ॥ १७८ ॥
तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें । उपजों उपजों मरणें । नावानावा ॥ १७९ ॥
तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें ।वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें ॥ १८० ॥
हें बहु असो देहपणें । नामरूपासि येणें ।नाहीं गा लाजिरवाणें । तयाहूनी ॥ १८१ ॥
ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा ।ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड ॥ १८२ ॥
आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया ।तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटे गती ॥ १८३ ॥
कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु । तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा ॥ १८४ ॥
एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें । तें अचापल्य वर्में । येणें होय ॥ १८५ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099