२ डिसेंबर २०१७ निरुपण
अध्याय ३: कर्मयोग (गीता श्लोक ३४-४३ / ज्ञानेश्वरी ओव्या २१०-२७६ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४॥
एर्हवीं इंद्रियांचिया अर्था । सारिखा विषो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥
परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥
बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥
देखैं इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥
परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तू जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥
तैसें अभिलाषें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥
जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणी मृगातें बुद्धि । साधावया ॥ २१६ ॥
एथ तैसीची परी आहे । म्हणौनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥
म्हणौनि हा आश्रोचि न करावा । मनेंहि आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदी ॥ २१८ ॥

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखैं ॥ २१९ ॥
येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥
सांन्नें शूद्र घरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं । तीं द्वीजें केंवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥
हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥
तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ? ॥ २२३ ॥
हें असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली । तर्ही भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥
तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तर्ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा ॥ २२५ ॥
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ? ॥ २२६ ॥
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते अळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥
म्हणौनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जिविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥ २२९ ॥
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ शारङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥
हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें । परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥ २३१ ॥

अर्जुन उवाच ।
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुउरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६॥

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनी अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥
सर्वज्ञुही जे होती । हेयोपादेयही जाणती । तेही परधर्में व्यभिचरिति । कवणें गुणें ? ॥ २३३ ॥
बीजा आणि भूसा । अंधु निवाडू नेणें जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ? ॥ २३४ ॥
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बळात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥ २३६ ॥
जयाची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥

श्रीभगवानुवाच ।
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७॥

तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं । हें कृतांताच्या ठायीं । मानिजती ॥ २४० ॥
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥
हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड । यांचें व्यामोहादिक दबड । जगावरी ॥ २४२ ॥
हे रजोगुण मानसींचे । समूळ आसुरियेचे । धालेपण ययांचें । अविद्या केलें ॥ २४३ ॥
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥ २४४ ॥
हे मृत्युच्या नगरीं । मानिजती निकियापरि । जे जीविताचे वैरी । म्हणौनियां ॥ २४५ ॥
जयांसि भुकेलिया आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥ २४६ ॥
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटी । तिये भ्रांतिही धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥
हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असे ॥ २४९ ॥
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥
साध्वी शांती नागविली । मग माया मांगी श्रृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥ २५१ ॥
इहीं विवेकाची त्र्याय फेडिली । वैराग्याचि खाल काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥
इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ २५३ ॥
इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥
हे आंगा तंव घडले । जीवींची आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥
हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं । म्हणौनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥
हे जळेंविण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥ २५७ ॥
हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥ २५८ ॥
हे चिखलेंवीण रोवितीं । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥
धूमेनाऽऽव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च । यथोल्बेनाऽऽवृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८॥

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥
कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥
तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञनिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेले ॥ २६३ ॥
आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥
यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं । तें इंधनें जैसीं आगी । सावावो होय ॥ २६५ ॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४०॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते ते यांसीचि होती विरजे । म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥
ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ४१॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळुनि घाली तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम तॄतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
हे अंतरींहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मिवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ २७० ॥
तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥
ते गुरुशिष्याचि गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥ २७२ ॥
ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥
आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगैल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥
तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥
ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोगावा बापा ॥ २७६ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ॥
No comments:
Post a Comment