२५ मार्च २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक ४ ते ७ / ज्ञानेश्वरी ओव्या 30 ते ६३ )
अर्जुन उवाच ।
कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥
देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥
वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले । जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥
जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
गुरुनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ॥ ५॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे । परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु । आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥
हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥
ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६॥
येर्हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥
पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥
जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु । कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥
नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
सारांश
अर्जुन म्हणतोय या अशा महान गुरुजनाना न मारता भिक्षा मागून जगणे मला योग्य वाटते. ये युध्द नसून
आमच्या हातून मोठा प्रमाद घडत आहे. माता पितरांची सेवा करावी, त्यांना संतुष्ट ठेवावे असा पुत्राचा धर्म आहे असे असता उलट त्यांच्याच आपण आपल्या हाताने वध कसा करावा. कुलगुरू आम्हाला अतिशय प्रिय आहेत. त्यांचे आमच्यावर ऋण आहे. त्यांच्याबद्दल वैर आम्हाला स्वप्नातही शक्य नाही. त्यापेक्षा आग लागो ह्या जगण्याला. ह्यांच्या कृपेने वरची प्राप्ती करावी त्यांच्यावरच कसे उलटावे. गुरू द्रोण दयेचे माहेरघर, गुणांचे भांडार, विद्येचा सागर आहेत. इतके मोठेपण असूनही त्यांनी आमच्यावर कृपा केली, त्यांना मारण्याची कल्पना सुद्धा मनात आणता येईल का? त्यांना मारून राज्यसुख आम्ही कसे भोगू? त्यापेक्षा देहत्याग करणे चालेल.
श्रीकृष्ण हे ऐकूनही बधत नाही म्हटल्यावर अर्जुन घाबरून परत बोलू लागला. देवा, आम्हाला जय मिळेल का? त्यांना मारावे की सोडावे? ते आम्हाला जिंकतील का? दोन्हीपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे? काहीच आम्हाला सुचत नाही. मोहामुळे माझे चित्त व्याकूळ झाले आहे.माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे, त्यामुळे माझे हित कशात आहे हे तूच मला सांग. तूच गुरू, बंधू, पिता, आमची इष्ट देवता आहेस. संकटसमयी तूच नेहमी आमचे रक्षण केले आहेस. तूच आम्हाला सर्वतोपरी आहेस. माझे आतापर्यंतचे बोलणे जर तुला मान्य नसेल तर आम्हाला उचित काय ते चटकन मला सांग.

No comments:
Post a Comment