सीमा बॊगाळे स्वाध्याय

 ओम श्री परमात्मने नम:, 

मी सौ सीमा बॊगाळे, मूळची मुंबईची, पण आता retirement नंतर पुण्यात रहाते.हा माझा पहिला अध्याय असल्याने हे निमित्त साधून सर्व प्रथम  मी सबनीस काकू आणि विवेक दादा यांचे आभार मानते , आपण दोघेही जण इतक्या उत्कृष्ठ पद्धतीने ज्ञानेश्वरी निरूपण करता की अगदी ऐकत रहावेसे वाटते. अस म्हणतात की अज्ञानात सुख असते , पण ज्ञानेश्वरी  आपल्या ला परमोच्च सुख अनुभवण्यासाठी  जे ज्ञान  आत्मसात करण्याची गरज  यासाठी चा मार्गदर्शक आहे. अर्थात  त्या साठी जी तयारी लागते त्याचे प्रयत्न स्वतःला करायचे आहेत , व दर रविवारी आपण सर्व एकत्र जो सत्संग करतो तो हे ज्ञान मिळवण्यासाठी  किंवा माझ्यातील अज्ञान दूर करण्यासाठी अतिशय  महत्वाचा आहे.

14 व्या अध्यायाचा स्वाध्याय  करताना सर्व प्रथम मी माझ्या स्वभावाचा विचार केला तेव्हा असे लक्षात आले की मला माणसे जोडायला खूप आवडते व ते जमते कारण मी माणसं वाचते. मुळात थोडी मानस शास्त्र याची आवड ही आहे. माणसं जोडण्याची / जवळ करण्याची इच्छा असल्यामुळे असेल कदाचित पण कुणाचे दोष बघण्यापेक्षा गुण बघते व त्या मुळे नातेवाईक, मित्र मैत्रिणी यांच्याशी चांगले संबंध जोडले आहेत.  याचे मूळ कशात आहे याचा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आले की हे आई वडिलांच्या संस्कारातून आले आहे . माझी आई तशी कमी बोलणारी व सतत कामात असलेली, आध्यत्मिक अशीच बघितली, त्या मुळे तिला कधी शेजारी पाजारी जाऊन वायफळ गप्पा करताना पाहिले नाही. वडीलही नेहमी दुसर्यांना मदत करणारे व सगळ्यांशी जुळवून घेणारे असेच आहेत. जेव्हा ज्ञानेश्वरी चा सत्संग सुरू केला व त्यात आपण पूर्वसंचित घेऊन जन्माला येतो असे समजले व त्या चा गर्भित अर्थ जसा समजू लागला तेव्हा आपली काही पूर्व पुण्याई असेल म्हणून असे आई वडील मिळाले याची जाणीव झाली. 

१४ व्या अध्याय सुरू झाल्यानंतर सत्व , रज आणि तमो गुण व त्याचे आपल्या स्वभावात असलेले कमी जास्त प्रमाण या पेक्षा गुणातीत होणे ही गीतेतील शिकवण अतिशय भावली  व त्या साठी कसे प्रयत्न करता येतील याचाच मन विचार करू लागले. कारण मी खूप सात्विक आहे याचा अभिमान देखील खूप अहंकार निर्माण करत असतो . 

काही वर्षांपूर्वी जेव्हा बंगलोर मध्ये आमची पुस्तक भिशी होती त्यात मैत्रेयी देवी यांचे " रवींद्रनाथांच्या सहवासात" हे पुस्तक वाचनात आले. त्यात गुरुदेव रवींद्रनाथ यांच्या सहवासातील  काही ठळक प्रसंग मैत्रेयी देवी यांनी लिहिले आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव ही पदवी का मिळाली असावी याची जाणीवआपल्याला या पुस्तकातील अनेक प्रसंग वाचताना पदोपदी मिळते. मला त्यांचा त्यातील एक विचार इथे आवर्जून नमूद करावासा वाटतो. गुरुदेव म्हणतात की आपल्या आवडीच्या व्यक्ती सोबत कोणीही जुळवून घेईल, पण जेव्हा एखादा माणूस आपल्याला आवडत नसेल किंवा त्या व्यक्ती ची उपस्थिती अयोग्य आहे असे आपल्याला वाटते, अशा लोकांनाही आपण थोडी जागा दिली पाहिजे. हा विचार त्या वेळी मला खूप आवडला होता, आणि आज ज्ञानेश्वरी अभ्यासत असताना लक्षात आले की भगवंत सुद्धा सतत आपल्यातील  आणि दुसऱ्या व्यक्ती तील ईश्वरी अंशाचे अनुसंधान राखा असेच सांगत आहेत.

गेल्या 20/25 वर्षात आपण अनेक बदलांना सामोरे गेलो व त्या मुळे नेहमी ' change is constant' यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी ही दाखवली. 14 व्या अध्यायात देखील भगवंत आपल्या ला तमो गुणा तुन , रजो गुणात आणि मग सत्व गुणातून , गुणातीत होण्याचा बदल आपल्यात घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत आणि तो आपण constantly करत राहणे हेच आपल्या ला साधत राहायचे आहे हे ही समजायला लागले आहे.  


हा माझा पहिला स्वाध्याय असल्याने काही चुका झाल्या असतील किंवा अजून खुप शिकायचे आहे हे ही माहीत आहे, त्या मुळे जितके समजले /उमजलेआहे त्या प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099