अध्याय १३ : ओव्या ८९१-९२६

६ सप्टेंबर २०२० निरुपण 

अध्याय १३  : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक १४-१६ / ज्ञानेश्वरी ओव्या ८९१-९२६ )


सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४॥


तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥ ८९२ ॥
उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥ ८९३ ॥
कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥ ८९४ ॥
किंबहुना पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥ ८९५ ॥
परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥ ८९६ ॥
पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥ ८९७ ॥
घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें । मठीं तरी चौफळें । आये दिसे ॥ ८९८ ॥
तरि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें । जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे ॥ ८९९ ॥
मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- । सारिखें ऐसें धनंजया । आवडे कीर ॥ ९०० ॥
पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥ ९०१ ॥
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे । परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥ ९०२ ॥
तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं । पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें ॥ ९०३ ॥
इया उघड मऱ्हाटिया । तें वेगळेपण धनंजया । जाण गुण इंद्रियां- । पासोनियां ॥ ९०४ ॥
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥ ९०५ ॥
तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं । परी तयाच्याचि ठायीं । आभासती ॥ ९०६ ॥
येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं । ऐसें जाय किरीटी । जे हेंचि धरी ॥ ९०७ ॥
तरी तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें । कां प्रतिवदन जैसें । आरसेनी ॥ ९०८ ॥
नातरी सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल । कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥ ९०९ ॥
तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण । परी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी ॥ ९१० ॥
आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें । रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥ ९११ ॥
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणीं लागु । बोलों नये ॥ ९१२ ॥


बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च । सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५॥


जें चराचर भूतां- । माजीं असे पंडुसुता । नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी ॥ ९१३ ॥
तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें । व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ ॥ ९१४ ॥
जें एक आंतुबाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं ॥ ९१५ ॥
क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी । हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा ॥ ९१६ ॥
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्यां भूतीं । जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं ॥ ९१७ ॥
पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥ ९१८ ॥
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । कां कोडी एकीं ऊसीं । एकचि गोडी ॥ ९१९ ॥


अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं । भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६॥


तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जें गा ॥ ९२० ॥
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेंचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥ ९२१ ॥
बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥ ९२२ ॥
सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥ ९२३ ॥
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥ ९२४ ॥
मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥ ९२५ ॥
नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन । तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत ॥ ९२६ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099