२० सप्टेंबर २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक २०-२२ / ज्ञानेश्वरी ओव्या ९६९-१०२९ )
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते । पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २०॥
तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं । मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या ॥ ९६९ ॥
तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया । तया नांव धनंजया । कार्य पैं गा ॥ ९७० ॥
आणि इच्छा मदाच्या थावीं । लागली मनातें उठवी । तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा ॥ ९७१ ॥
म्हणौनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा । प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे ॥ ९७२ ॥
एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये । परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी ॥ ९७३ ॥
जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे । रजोगुणें निफजे । मध्यम तें ॥ ९७४ ॥
जें कां केवळ तमें । होती जियें कर्में । निषिद्धें अधमें । जाण तियें ॥ ९७५ ॥
ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें । तयापासोनि निर्वाळतें । सुखदुःख गा ॥ ९७६ ॥
असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे । तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा ॥ ९७७ ॥
सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं । तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी ॥ ९७८ ॥
प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी । जे आंबुली जोडी । आंबुला खाय ॥ ९७९ ॥
आंबुला आंबुलिये । संगती ना सोये । कीं आंबुली जग विये । चोज ऐका ॥ ९८० ॥
पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् । कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु ॥ २१॥
जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा । जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु ॥ ९८१ ॥
तया आडनांव पुरुषु । एऱ्हवीं स्त्री ना नपुंसकु । किंबहुना एकु । निश्चयो नाहीं ॥ ९८२ ॥
तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु । रूप ना वर्णु । नाम आथी ॥ ९८३ ॥
अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं । कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें ॥ ९८४ ॥
तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता । परी इया पतिव्रता । भोगविजे ॥ ९८५ ॥
जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु । ते भलतैसाही खेळु । लेखा आणी ॥ ९८६ ॥
मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव । किंबहुना सावेव । गुण तेचि हे ॥ ९८७ ॥
हे प्रतिक्षणीं नीत्य नवी । रूपा गुणाचीच आघवी । जडातेंही माजवी । इयेचा माजु ॥ ९८८ ॥
नामें इयें प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें । इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि ॥ ९८९ ॥
कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक । ऐसें ऐसें अलौकिक । करणें इयेचें ॥ ९९० ॥
हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप । विकार उमप । इया केले ॥ ९९१ ॥
हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी । इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम ॥ ९९२ ॥
हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी । प्रपंचाची धाडी । अभंग हे ॥ ९९३ ॥
कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया । इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे ॥ ९९४ ॥
हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळु इयेचा ॥ ९९५ ॥
जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात । हें असो अद्भुत । मोहन हे ॥ ९९६ ॥
हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे । निराळेंसि घरें । नांदत असे ॥ ९९७ ॥
इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी । म्हणौनि तया आवरी । अनावरातें ॥ ९९८ ॥
तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं । कीं तया आघवेहीं । आपणचि होय ॥ ९९९ ॥
तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती । आपण होय स्थिती । ठावो तया ॥ १००० ॥
तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती । तया अकुळाची जाती- । गोत होय ॥ १००१ ॥
तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान । तया अमनस्काचें मन । बुद्धीही होय ॥ १००२ ॥
तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु । निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके ॥ १००३ ॥
तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म । आपण होय कर्म- । क्रिया तया ॥ १००४ ॥
तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु ॥ १००५ ॥
तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव । किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे ॥ १००६ ॥
ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती । तया अविकारातें विकृती- । माजीं कीजे ॥ १००७ ॥
तेथ पुरुषत्व जें असे । तें ये इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । पडिला जैसा ॥ १००८ ॥
विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका । कसु होय पांचका । जयापरी ॥ १००९ ॥
कां साधूतें गोंधळी । संचारोनि सुये मैळी । नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे ॥ १०१० ॥
जेवीं पय पशूच्या पोटीं । कां वन्हि जैसा काष्ठीं । गुंडूनि घेतला पटीं । रत्नदीपु ॥ १०११ ॥
राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला । तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके ॥ १०१२ ॥
जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा । स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ॥ १०१३ ॥
तैसें प्रकृति जालेपणें । पुरुषा गुण भोगणें । उदास अंतुरीगुणें । आतुडे जेवीं ॥ १०१४ ॥
तैसें अजा नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये । वाजती जैं लाहे । गुणसंगातें ॥ १०१५ ॥
परि तें ऐसें पंडुसुता । तातलें लोह पिटितां । जेवीं वन्हीसीचि घाता । बोलती तया ॥ १०१६ ॥
कां आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक । तें नानात्व म्हणती लोक । चंद्रीं जेवीं ॥ १०१७ ॥
दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा । कां कुंकुमें स्फटिका । लोहितत्व ये ॥ १०१८ ॥
तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे । पावतु ऐसा गमे । एऱ्हवीं नाहीं ॥ १०१९ ॥
अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी । जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यजादि जाती ॥ १०२० ॥
म्हणौनि केवळा पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा । येथ गुणसंगुचि अशेखा- । लागीं मूळ ॥ १०२१ ॥
उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः ॥ २२॥
हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा । इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु ॥ १०२२ ॥
प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी । माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे ॥ १०२३ ॥
प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे । म्हणौनि आब्रह्माचें होये । शासन हा ॥ १०२४ ॥
प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये । इयालागीं इये । वरयेतु हा ॥ १०२५ ॥
अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी । तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं ॥ १०२६ ॥
हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी । अपारपणें मवी । प्रपंचातें ॥ १०२७ ॥
पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी । बोलिजे तें अवधारीं । ययातेंचि ॥ १०२८ ॥
अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता । प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पैं ॥ १०२९ ॥

No comments:
Post a Comment