अध्याय ६: ओव्या ३४५-३७१

७ ऑक्टोबर २०१८ निरुपण 
अध्याय ६: ध्यानयोग  (गीता श्लोक १६-२२ / ज्ञानेश्वरी ओव्या ३४५-३७१)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः । न चाति स्वप्‍नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६॥
जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहींच एथ म्हणितला । अधिकारिया ॥ ३४५ ॥
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारूनियां ॥ ३४६ ॥
निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ? ॥ ३४७ ॥
म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नोहावा । कां सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥ ३४८ ॥
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्‍नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७॥
आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥
मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥ ३५० ॥
जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥ ३५१ ॥
ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥ ३५२ ॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८॥
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आंत आंत सुख वाढे । तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥ ३५३ ॥
जैसें भाग्याचिया भडसें । उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥ ३५४ ॥
तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥
म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥ ३५६ ॥
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता । योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९॥
युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥ ३५७ ॥
तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचे उपलक्षण । निर्वातींचिया ॥ ३५८ ॥
आतां तुझें मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणौनि । तें निकें चित्त देउनी । परिसावें गा ॥ ३५९ ॥
तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासीं दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ? ॥ ३६० ॥
तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें । वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ॥ ३६१ ॥
पाहें पां आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ? ॥ ३६२ ॥
ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुःखें । एर्‍हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ? ॥ ३६३ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २०॥
सुखमात्यन्तिकं यत्तद्‍बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१॥
म्हणौनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका । तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥ ३६४ ॥
एर्‍हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥ ३६५ ॥
परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे । देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी ॥ ३६६ ॥
तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । मग आपणपां समरसें । विरोनि जाय ॥ ३६७ ॥
जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं । तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥ ३६८ ॥
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः । यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२॥

मग मेरूपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें । दाटिजो पां पडिभरें । चित्त न दटे ॥ ३६९ ॥
कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥ ३७० ॥ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासु न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099