30 ऑगस्ट २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक १3 / ज्ञानेश्वरी ओव्या ८७४ -८९१ )
निरूपण ऐकताना खाली दिलेली इमेज जरूर बघा.
सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३॥
आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी । जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे ॥ ८७४ ॥
तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें । जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी ॥ ८७५ ॥
आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया । आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम ॥ ८७६ ॥
पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे । तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें ॥ ८७७ ॥
म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायीं पक्षु । बोलावया दक्षु । जाहला वेदु ॥ ८७८ ॥
जें सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥ ८७९ ॥
पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख । तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे ॥ ८८० ॥
यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था । आली वाक्पथा । श्रुतीचिया ॥ ८८१ ॥
आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न । तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया ॥ ८८२ ॥
म्हणौनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें । एवं जें सर्वांतें । आवरूनि असे ॥ ८८३ ॥
एऱ्हवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती । तयाचिया व्याप्ती । रूप केलें ॥ ८८४ ॥
वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे ? । सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जें ॥ ८८५ ॥
पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे । परी ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई ? ॥ ८८६ ॥
तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक ? । परी बोलावया नावेक । करावें लागे ॥ ८८७ ॥
पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें । तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥ ८८८ ॥
एऱ्हवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा । आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे ॥ ८८९ ॥
म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं । निरूपणाची वाहती । वाट केली ॥ ८९० ॥
तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं । तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे ॥ ८९१ ॥

No comments:
Post a Comment