३१ जानेवारी २०२१ निरुपण
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पवकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ ६॥
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी । हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें ॥ ३०८ ॥
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें । विश्व भासतसे जेणें । लपालेनी ॥ ३०९ ॥
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें । कां दोरी लोपतां सापें । फार होइजे ॥ ३१० ॥
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें । तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती ॥ ३११ ॥
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी । चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे ॥ ३१२ ॥
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा । यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग ॥ ३१३ ॥
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं । सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं ॥ ३१४ ॥
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे । कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका ॥ ३१५ ॥
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं । तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा ॥ ३१६ ॥
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें । महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे ॥ ३१७ ॥
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं । होयचि ना माघारी । परती जैसी ॥ ३१८ ॥
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा । नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं ॥ ३१९ ॥
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट । तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा ॥ ३२० ॥
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो । परी विनंती एकी देवो । चित्त देतु ॥ ३२१ ॥
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती । ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी ॥ ३२२ ॥
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध । जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां ॥ ३२३ ॥
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें । मागुते पडती तैसे । येतीचि ते ॥ ३२४ ॥
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें । आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ? ॥ ३२५ ॥
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा । नये बोलों अवयवां । शरीरेंसीं ॥ ३२६ ॥
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं । मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ? ॥ ३२७ ॥
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते । हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी ॥ ३२८ ॥
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा । तोषला बोध शिष्याचा । देखोनियां ॥ ३२९ ॥
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती । ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी ॥ ३३० ॥
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें । ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती ॥ ३३१ ॥
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ । एर्हवीं तरी निखिळ । पाणीचि तें ॥ ३३२ ॥
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें । मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें ॥ ३३३ ॥
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी । येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव ॥ ३३४ ॥
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें । भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल ॥ ३३५ ॥
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी । तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ? ॥ ३३६ ॥
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? । म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज ॥ ३३७ ॥
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें । रवी दुजेपण आलें । तोयबगें ॥ ३३८ ॥
व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे । परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी ॥ ३३९ ॥
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे ? । स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें ॥ ३४० ॥
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें । तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी ॥ ३४१ ॥
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे । मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें ॥ ३४२ ॥
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥ ७॥
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे । तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें ॥ ३४३ ॥
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें । तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं ॥ ३४४ ॥
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता । मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं ॥ ३४५ ॥
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा । तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो ॥ ३४६ ॥
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें । तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन ॥ ३४७ ॥
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं । जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत ॥ ३४८ ॥
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा । आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे ॥ ३४९ ॥
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे । परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती ॥ ३५० ॥
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु । बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां ॥ ३५१ ॥
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें । तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ ॥ ३५२ ॥
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे । मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा ॥ ३५३ ॥
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- । सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे ॥ ३५४ ॥
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे । मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं ॥ ३५५ ॥
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा । आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय ॥ ३५६ ॥
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं । मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे ॥ ३५७ ॥
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा । रसाचा दरकुटा । भरोंचि लागे ॥ ३५८ ॥
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें । मग गंधाची दारुणें । आडवें लंघी ॥ ३५९ ॥
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें । भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें ॥ ३६० ॥
No comments:
Post a Comment