१४ नोव्हेंबर २०२१ निरुपण
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च ॥ ५१॥
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा । धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें ॥ १०११ ॥
मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली । तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि ॥ १०१२ ॥
सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी । द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी ॥ १०१३ ॥
आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर । इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे ॥ १०१४ ॥
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया । तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें ॥ १०१५ ॥
नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना । तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं ॥ १०१६ ॥
मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें । ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें ॥ १०१७ ॥
पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें । मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं ॥ १०१८ ॥
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे । तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी ॥ १०१९ ॥
ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये । तयालागीं न होये । साभिलाषु ॥ १०२० ॥
यापरी इष्टानिष्टींंं । रागद्वेष किरीटी । त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे ॥ १०२१ ॥
विविक्तसेवी लघ्वाशी यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ ५२॥
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया । अंगाचियाचि मांदिया । एकलेया ॥ १०२२ ॥
शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे । गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु ॥ १०२३ ॥
आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें । कां जिभीचे पुरवावे । मनोरथ ॥ १०२४ ॥
भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी । आहारीं मिती संतोषीं । माप न सूये ॥ १०२५ ॥
अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥ १०२६ ॥
आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या न मोकली । आसन तैसें ॥ १०२७ ॥
दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे । वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ ॥ १०२८ ॥
देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें । किंबहुना आपैतें । सबाह्य केलें ॥ १०२९ ॥
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा । तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ? ॥ १०३० ॥
ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश । आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें ॥ १०३१ ॥
गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला । न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा ॥ १०३२ ॥
पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं । ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा ॥ १०३३ ॥
तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता । होय तंव पंडुसुता । कीजे तें गा ॥ १०३४ ॥
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु । परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा ॥ १०३५ ॥
अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया । पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ ॥ १०३६ ॥
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध । करूनि एकवद । वायुभेदी ॥ १०३७ ॥
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि । आधारादि भेदूनि । आज्ञावरी ॥ १०३८ ॥
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु । तो मूळवरी वोघु । आणूनियां ॥ १०३९ ॥
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं । मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां ॥ १०४० ॥
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां । ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें ॥ १०४१ ॥
आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं ।पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें ॥ १०४२ ॥
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा । तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले ॥ १०४३ ॥
पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी । तरी कें आहे अवसरी । देखावया ॥ १०४४ ॥
तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया । तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा । ॥ १०४५ ॥
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु । करूनि जाला योग्यु । आत्मलाभा ॥ १०४६ ॥
ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं । राजयोगतुरंगीं । आरूढला ॥ १०४७ ॥
वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी ।तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें ॥ १०४८ ॥
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं ॥ १०४९ ॥
No comments:
Post a Comment