अध्याय ९ : ओव्या ४०२-४२४

८ जून २०१९ निरुपण 
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक २८-३१ / ज्ञानेश्वरी ओव्या  ४०२-४२४)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः । संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८॥
मग अग्निकुंडीं बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेवीं मुकलीं । तेवीं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥ ४०२ ॥
अगा कर्में जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें । आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ४०३ ॥
ते उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरण जन्म । जन्मासवें श्रम । वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
म्हणौनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळु नव्हेल भारी । हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ ४०५ ॥
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखांचियां सागरीं न बुडिजे । सुखें सुखरूपा घडिजे । माझियाचि आंगा ॥ ४०६ ॥

समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यो~स्ति न प्रियः । ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९॥
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा । जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥
जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।जे जीवें कर्में करूनि । मातें भजलें ॥ ४०८ ॥
ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझ्या ठायीं । आणि मी तयांच्या हृदयीं । समग्र असे ॥ ४०९ ॥
सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे । आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥ ४१० ॥
तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें । वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥ ४११ ॥
आतां जायांचें जैसें लेणें । आंगावरी आहाचवाणें । तैसें देहधरणें । उदास तयांचें ॥ ४१२ ॥
परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देंठीं ।तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ ४१३ ॥
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्‍भावा । मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥ ४१४ ॥
अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् । साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३०॥
ऐसे भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे । तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥ ४१५ ॥
आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा । परि जीवित वेंचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती । म्हणौनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥
तो आधीं जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं । जैसा बुडाला महापुरीं । न मरतु निघाला ॥ ४१८ ॥
तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें । तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥
यालागीं दुष्कृती जर्‍ही जाहाला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला । न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥
तरी आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ । जन्मलेयाचें फळ । तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥
तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला । अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥ ४२२ ॥
हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्में सर्वथा । जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं ॥ ४२३ ॥
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेची पेटी । मजमाजीं किरीटी । निक्षेपिलीं जेणें ॥ ४२४ ॥

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१॥


No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099