१५ मार्च २०२० निरुपण
अध्याय १२ : भक्तीयोगः ( श्लोक ९-११ /ज्ञानेश्वरी ओव्या १०४-१४०)
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९॥
अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित । माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों ॥ १०४ ॥
तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं । मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥ १०५ ॥
मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख । तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥ १०६ ॥
जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे । तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥ १०७ ॥
मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें । हारपत अंवसे । नाहींचि होय ॥ १०८ ॥
तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां । हळूहळू पंडुसुता । मीचि होईल ॥ १०९ ॥
अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे । येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥ ११० ॥
पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे । व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं ॥ १११ ॥
विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे । एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥ ११२ ॥
म्हणौनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं । यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव । मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०॥
कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझिया अंगीं । तरी आहासी जया भागीं । तैसाचि आस ॥ ११४ ॥
इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं । अभिमानु न संडीं । स्वजातीचा ॥ ११५ ॥
कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं । मग सुखें तुज सरळी । दिधली आहे ॥ ११६ ॥
परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये । तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥
करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥ ११८ ॥
उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुलिया ठायीं । स्वजाती करूनि घेईं । जीवित्व हें ॥ ११९ ॥
माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें । तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ॥ १२० ॥
म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघे मती । अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायीं ॥ १२१ ॥
एर्हवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां । रथु काई खटपटा । करितु असे ? ॥ १२२ ॥
आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे । निवांतचि अर्पिजे । माझ्यां ठायीं ॥ १२३ ॥
ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना । तूं सायुज्य सदना । माझिया येसी ॥ १२४ ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११॥
ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज । तरी तूं गा बुझ । पंडुकुमरा ॥ १२५ ॥
बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं । मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी ॥ १२६ ॥
तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो । परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी ॥ १२७ ॥
आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें । तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय ॥ १२८ ॥
वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं । तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें ॥ १२९ ॥
परि मातें मनीं धरावें । कां मजौद्देशें करावें । हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥
खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें । कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें ॥ १३१ ॥
अगा आत्मजेच्या विषीं । जीवु जैसा निरभिलाषी । तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं ॥ १३२ ॥
वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं । क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी ॥ १३३ ॥
अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु । परी योगामाजीं योगु । धुरेचा हा ॥ १३४ ॥
येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे । एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं ॥ १३५ ॥
तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे ॥ १३६ ॥
पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी । ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये ॥ १३७ ॥
मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव । तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके ॥ १३८ ॥
कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे । त्यागास्तव आंगवे । शांति सगळी ॥ १३९ ॥
म्हणौनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ ॥ १४० ॥

No comments:
Post a Comment