अध्याय १० : ओव्या १-२३

२८ जुलै  २०१९ निरुपण 
अध्याय १० : विभूतीयोगः (ज्ञानेश्वरी ओव्या १-२३)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.


॥  श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ दशमोऽध्यायः – अध्याय दहावा । 
। विभूतियोगः ।


नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा । पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या । तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना । सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा । श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु । तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी ॥ ६ ॥
जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा । तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे ॥ ७ ॥
जी आपुलिया स्‍नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी । तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥ ८ ॥
हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे । तो जीवचि परि तुके । महेशेंसीं ॥ ९ ॥
एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें । कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ? ॥ १० ॥
केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? । कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ? ॥ ११ ॥
चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें । गगनावरी उभवावें । घडे केवीं ? ॥ १२ ॥
तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन ? । हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥ १३ ॥
जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे । तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥
कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं । उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ १५ ॥
मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं । म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥
मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी । उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी ॥ १७ ॥
ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें । बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें ॥ १८ ॥
तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो । ते भगवद्‍गीता वोंविये गावों । ऐसें केलें ॥ १९ ॥
जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता । परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥
होती देहबुद्धी एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी । मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें ॥ २१ ॥
ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें । तर्‍ही अनुवादलों धीटपणें । ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥
आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्‍गीता वोंवीप्रबंधें । पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥ २३ ॥

No comments:

Post a Comment

ब्लॉगविषयी थोडेसे

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गामध्ये आम्ही ओव्या वाचतो. त्याचे निरुपण श्री. विवेक सबनीस करतात. निरूपणाचे ऑडीओ रेकॉर्डिंग, वाचलेल्या ओव्या आणि त्यांची थोडक्यात माहिती ह्या ब्लॉगवर तुम्हाला वाचायला मिळेल. अभ्यास वर्ग दर रविवारी सकाळी असतो. प्रत्येक भागाचे रेकॉर्डिंग वरील लिंक्सवर जरूर ऐका.

ब्लॉग संयोजक
सौ. मंजिरी सबनीस आणि सौ. धनश्री कुलकर्णी

एकूण भेटी

ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग, बंगलोर

तुमचा अभिप्राय आम्हाला खालील मेलवर किंवा फोनवर जरूर कळवा. dnyaneshwaripravachane@gmail.com किंवा मोबाईल: 9880002099