२२ सप्टेंबर २०१९ निरुपण
अध्याय १० : विभूतीयोगः (गीता श्लोक ३२-४२ / ज्ञानेश्वरी ओव्या २५९-३३५)
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन । अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२॥
अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च । अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतोमुखः ॥ ३३॥
जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं । तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥ २५९ ॥
कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा । तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥ २६० ॥
जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ । तरी उपडूनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥
तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष । तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥ २६२ ॥
एर्हवीं वेगळालिया विभूती । कायि{ए}क परिससी किती । म्हणौनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥ २६३ ॥
मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी । ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं ॥ २६४ ॥
ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें । परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणौनि असो ॥ २६५ ॥
कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणौनि तिया आईक सुभद्रापती । तरी विद्यांमाजीं प्रस्तुतीं । अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥
अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं । जो सकलशास्त्रसंमतें कहीं। सरेचिना ॥ २६७ ॥
जो निर्वचूं जातां वाढे । आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे । जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होतीं ॥ २६८ ॥
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु । अक्षरांमाजीं विशदु । अकारु तो मी ॥ २६९ ॥
पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं । मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥ २७० ॥
मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी । जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथ ॥ २७१ ॥
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी । आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥ २७२ ॥
ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु । मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥ २७३ ॥

मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् । कीर्तिः श्रीर्वाक् च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४॥
आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं । शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥
आतां स्त्रीगणांच्या पैकीं । माझिया विभूती सात आणिकी । तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥ २७५ ॥
तरी नित्य नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती । आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥
आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचा । आरूढोनि विवेकाचा । मार्गीं चाले ॥ २७७ ॥
देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें । ते स्मृतिही एथें । त्रिशुद्धी मी ॥ २७८ ॥
पैं स्वहिता अनुयायिनी । मेधा ते गा मी इये जनीं । धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥ २७९ ॥
एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मी अवधारीं । ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥ २८० ॥
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् । मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५॥

वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥ २८१ ॥
गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥
मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥ २८३ ॥

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् । जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६॥
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः । मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७॥
छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा । म्हणौनि चोहटां चोरी परी कवणा । निवारूं न ये ॥ २८४ ॥
अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥ २८५ ॥
जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझें स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥
सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवांमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥ २८७ ॥
जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें ॥ २८८ ॥
नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवीं सृष्टि केली । करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥ २८९ ॥
कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥ २९० ॥
प्रथमदशेचिये पहांटे- । माजीं कंसा ऐशीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥
हें काय किती{ए}क सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥ २९२ ॥
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणौनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥ २९३ ॥
संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । तर्ही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥ २९४ ॥
मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो । कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी ॥ २९५ ॥

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् । मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८॥
अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं । जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥ २९६ ॥
पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां । सकळ शास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥
आघवियाचि गूढां- । माजीं मौन तें मी सुहाडा । म्हणौनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥
अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं । आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥ २९९ ॥

यच्चाऽपि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन । न तदसेति विना यत्स्यान्मया भूतं चराचरम् ॥ ३९॥
नान्तोऽस्ति मम दिव्यांना विभूतीनां परंतप । एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४०॥
पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा । कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥ ३०० ॥
पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा । तेवीं माझिया विशेषलिंगां । नाहीं मिती ॥ ३०१ ॥
ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना । तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥ ३०२ ॥
येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं । म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती ॥ ३०३ ॥
यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज । तरी सर्व भूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी ॥ ३०४ ॥
म्हणौनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे । एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥ ३०५ ॥
तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण । तरी अर्जुना तें तूं जाण । विभूति माझी ॥ ३०६ ॥

यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ४१॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया ठाया । ते ते जाण धनंजया । विभूति माझी ॥ ३०७ ॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भ्गवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं । प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥
तयांतें एकलें झणीं म्हण । तो निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्वस्व हन । चालत असे ? ॥ ३०९ ॥
तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया आंगें । होऊनि असती ॥ ३१० ॥
तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि तें जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥ ३११ ॥
आणि सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व हें म्हणौनि ॥ ३१२ ॥
तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलिये मती वंगु । भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥
एर्हवीं तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें । हां गा वायूसि काय पां डावें । उजवें आंग आहे ? ॥ ३१४ ॥
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी । तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥ ३१५ ॥
आणि सिनाना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणौनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥ ३१६ ॥
आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ३१७ ॥
ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥
तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलें तुम्हीं । जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकीं ॥ ३१९ ॥
हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें । तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥
तुझें नामचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां कानां मिळे । तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच ॥ ३२१ ॥
तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ? ॥ ३२२ ॥
जी चंद्रबिंबाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा । परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥
तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें । मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥ ३२४ ॥
आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी । ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें ॥ ३२५ ॥
हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं । तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥ ३२६ ॥
तेथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें । परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें ॥ ३२७ ॥
पैं राया तो पंडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरितु । या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें । हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तंव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥
परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु । कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥ ३३० ॥
म्हणे हेचि हृदया आंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती । इये आर्तीचिया पाउलीं मती । उठती जाहली ॥ ३३१ ॥
मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा । एवढी हांव तो देवा आगळा । म्हणौनि करी ॥ ३३२ ॥
आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणौनि वांझोळें न लगती देखा । जें जें येईल तयाचि मुखा । तें तें साचचि करितसे येरु ॥ ३३३ ॥
जो प्रर्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला ।तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥ ३३४ ॥
म्हणौनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं । तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५ ॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दशमोऽध्यायः ॥
No comments:
Post a Comment