१५ एप्रिल २०१७ निरुपण
अध्याय 2: सांख्ययोग(गीता श्लोक १६ / ज्ञानेश्वरी ओव्या १२५ ते १३२ )
निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
सारांश:-
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६॥
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥
या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥
म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
अविद्यमान वस्तूला कधी
अस्तित्व नसते, विद्यमान वस्तूचा कधी आभाव नसतो. या दोन्हीचाही निर्णय तत्ववेत्त्यानी
जाणला आहे. म्हणजे जी सद्वस्तु- चैत्यन्य आहे तेच एक शाश्वत
आहे आणि शरीर अशाश्वत आहे. हे ज्ञानी लोक विचाराने जाणतात. ह्या देहामध्ये चैतन्य
आहे पण गुप्तरूपाने आहे. दूध आणि पाणी एकत्र केले असता ते एकरूप होऊन जाते. पण
राजहंस ज्याप्रमाणे निवडून ते वेगळे करतो. त्याप्रमाणे ज्ञानी लोक- तत्व जाणणारे
संत हे ओळखून त्याचा स्वीकार करतात.
ह्यासाठी माऊली नी
वेगवेगळे दृष्टांत दिले आहेत.
चतुर लोक हिणकस सोने
अग्नीत घालून शुध्द करून घेतात अथवा कौशल्याने दही घुसळले असता ज्याप्रमाणे लोणी
दृष्टीस पडते किंवा एकच झालेला भुसा आणि धान्य उफणले असता धान्य जागेवर राहते व
फोलकट उडून जाते असे दिसते . त्याप्रमाणे विचार केला की ज्याचा निरास होतो असा
प्रपंच ज्ञानी पुरुष सहज टाकून देतात मग त्यास एक ब्रह्मतत्वच उरते. म्हणून
ज्यांनी दोहोमधील सार ओळखले त्यांचा अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणी, त्या नित्य आहेत
असा निश्चय नसतो .
रामकृष्ण
ReplyDelete