१६ सप्टेंबर २०१७ निरुपण
। अथ तृतीयोऽध्यायः – अध्याय तीसरा । । कर्मयोगः ।
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत् किं कर्मणि घोरे माम् नियोजयसि केशव ॥ १॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें । कमळापती ॥ १ ॥
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥ २ ॥
तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कर्मीं सुतां ॥ ३ ॥
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी ॥ ४ ॥
तरी हेंचि विचारीं ऋषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशां । आणि येसणी हे हिंसा । करवीतु आहासी ॥ ५ ॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणती काय करावें । आतां संपले म्हण पां आघवें । विवेकाचें ॥ ६ ॥
हां गा उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥ ७ ॥
वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसनि जिये । सांगैं मज ॥ ८ ॥
जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥
तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ? ॥ ११ ॥
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हण ॥ १२ ॥
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
तरी ये जाणिवेचें तरी सरलें । परी आणिक एक असे जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥
तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥ १५ ॥
ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥
म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥ १७ ॥
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥
देखैं रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥
तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥
देवा तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥ २१ ॥
हां गां कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरीं कामनेची कां तेथें । वानी कीजे ? ॥ २२ ॥
जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ? ॥ २३ ॥
देखा अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावे । मागील ते ? ॥ २४ ॥
तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां श्रीलक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥
तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा ? । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥
देखैं सकळार्तींचें जियाले । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥
जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥ २८ ॥
जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥
तैसें देवा तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधीं ॥ ३० ॥
तरीं पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगैं एक निश्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥

श्रीभगवानुवाच ।
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानाम् कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३॥
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानाम् कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३॥
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥
जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥
तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥
अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥
एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ ओळखीसवें पाविजें । तद्रूपता ॥ ३६ ॥
एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥
हे मार्गु तरी दोनी । परी एकवटतीं निदानीं । जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एक ॥ ३८ ॥
कां पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां । मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥
तैसीं दोनीही मतें । सूचितीं एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते- । आधीन असे ॥ ४० ॥
देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥
तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥
तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥
येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
अध्याय 3: कर्मयोग : - ओवी :1-44 -- सारांश
दुसऱ्या अध्यायात आत्मस्वरुपाचे , स्थितप्रज्ञ याचे विस्तृत वर्णन केलेले आहे.
अजूनही अर्जुन मोहामुळे युद्ध न करण्याच्या विचारात सोयीस्कर तेवढे ऐकून भगवंतांनाच प्रश्न करतो की ज्ञानमार्ग हा कर्मपेक्षा श्रेष्ठ वाटतो तर मला घोर युद्ध करण्यास का सांगतो ? त्याला तसे बोलणे म्हणजे जणू आंधळ्याला आडमार्गाला लावण्यासारखे किंवा माकडाला मादक पदार्थ पाजण्यासारखे वाटते. त्याने मन अजूनच गोंधळल्या सारखे, घोटाळ्यात पडलं असे वाटते.
कृष्णाशी आईचे नाते लावून, असा गुरू मिळणे म्हणजे जणू कामधेनू किंवा चिंतामणी मिळावा तसे आहे, तेंव्हा मनाला निःसंशय करणारे,गूढ ज्ञान सोप्या भाषेत सांगण्याची विनंती करतो. ज्याप्रमाणे आई मुलाची दुधाची भूक वेळ - काळ न बघता भागवते त्याप्रमाणे माझी ज्ञानाची तहान भागव असे भगवंतांना म्हणतो.
तेंव्हा भगवंत सांगतात की यापूर्वी ही मी ज्ञानी लोकांसाठी सांख्ययोग आणि कर्मयोग्यांसाठी कर्मयोग सांगितलं आहे. दोन्ही मार्ग शेवटी परामात्मस्वरूपाशी जाऊन मिळतात.मार्ग वेगळे असले तरी साध्य शेवटी एकच आहे. साधकाच्या योग्यतेनुसार त्याचा मार्ग ठरणार. जसे जर फळ तोडायचे असेल तर पक्षी एक झेपत तोडले पण माणसाला तेच फळ तोडायला वेगळा प्रयत्न करावा लागेल.एक मार्ग जणू खडतर पण जवळचा आहे आणि एक जरा लांबचा पण सरळ आहे.
ज्या वेळी मनात संकल्प उठतो तो पूर्ण करण्याचा जो प्रयत्न होतो ते कर्म. कर्म हे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही प्रकाराने होते. एकच गोष्ट कृतीने करून आणि स्वप्नात झाली तरी मनाला सारखाच आनंद मिळतो . ज्ञानेंद्रियांच्या साह्याने जग, प्रसंग, घटना अनुभवला येतात तेही मनातच. मन जणू कॅमेरा आहे, जे बघतो त्याची प्रतिमा उमटते. मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे सगळे अंतःकरणात आहेत.ह्या सगळ्या वृत्ती आहेत, त्या येतात -जातात. त्यातील अहंकार मात्र स्थिर आहे. जन्मापासून घडणाऱ्या घटनांची जणू चाललेली साखळी अहंकाराला म्हणजेच मनात असलेल्या 'मी' ला कळते. जसे गाढ झोपेत मन ,चित्त ,बुद्धी जागृत नसते पण अहंकार रुपी 'मी'ला झोपेत काय झाले ते सगळे कळते. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत केलेल्या चांगल्या-वाईट कर्माचा, घटनांचा ठसा मनात उमटतो.प्रसंग, घटना येतात -जातात ,त्या सुख- दुःख देऊन जातात हे मनाला कळते. प्रसंगानुसार वागून, त्यात गुंतून ना पडता पुढे गेलो तर मनावर होणारे आघात,संस्कार कमी- कमी होत जातील. कर्मामुळे आनंद मिळतो पण तो तात्पुरता ,पण खरे तसे न होता प्रसंगानुसार मनात राग,लोभ, द्वेष, मत्सर याचा कचरा भरला जातो.आणि तेच साठलेले संस्कार घेऊन आज जगतो.प्रसंग येणारच पण त्याकडे बघण्याची दृष्टी बदलली तर मनावर होणारे परिणाम कमी होतील.कुठल्याही कर्माला फळ हे आहेच आणि ते मिळणारच, आज-उद्या- या जन्मात किंवा पुढच्या जन्मात कधीतरी नक्कीच. परंतु ते मला हवे तसेच असेल असे नाही.
ह्या मनातील संस्कारांचा परिणाम कधीतरी प्रसंगाच्या माध्यमातून उफाळून बाहेर पडतो त्यामुळे कर्मबंधनात मनुष्य अडकून पडतो. मी कर्ता म्हणून अहंकाराने त्यात अडकतो.मनाची पती कोरी असेल तर ज्ञानमार्गाने जात येईल पण तसे नसेल तर कर्ममार्गशिवाय पर्याय नाही. कर्म मुळेच बंधनात अडकलो आहे आणि कर्मा मुळेच त्यातून मुक्त व्हायचं असेल तर ते निष्काम होणे आवश्यक आहे. मन तेच असणार , प्रसंग तेच असणार फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलायचा आहे.
अतिशय सुंदर समजावले..आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. निष्काम होणे आवश्यक. 🙏🙏
ReplyDelete