१ एप्रिल २०१८ निरुपण
अध्याय ४ : ज्ञानकर्मसंन्यासयोग (गीता श्लोक ३२-३३ / ज्ञानेश्वरी ओव्या १५७-१६७)
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ञानयज्ञः परंतप । सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३॥
अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ । जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥ १५७ ॥
ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती । जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ १५८ ॥
देखैं परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन । जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥ १५९ ॥
जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी । जें भुकेलिया धणी । साधनाची ॥ १६० ॥
जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली । जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥ १६१ ॥
मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलकेंपण ठेलें । जयामाजी सांपडलें । ज्ञेय दिसे ॥ १६२ ॥
जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे । जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥ १६३ ॥

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ३४॥
तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें । तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ॥ १६४ ॥
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६५ ॥
तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६६ ॥
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें । जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥ १६७ ॥

Thank you. Very uaeful. Will try to get updated.
ReplyDeleteDhanyawad RavindraJi
Delete