२१ जून २०२० निरुपण
अध्याय १३ : क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ( श्लोक ५-६ / ज्ञानेश्वरी ओव्या ७२ - १८४ )
निरूपण ऐकताना खालील इमेज चा उपयोग करावा.
महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५॥
इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः । एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६॥
तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु । बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा ॥ ७२ ॥
मन आणीकही एकु । विषयांचा दशकु । सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा ॥ ७३ ॥
आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती । सांगितली तुजप्रती । आघवीची ॥ ७४ ॥
आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे । हें वेगळालेपणें । एकैक सांगों ॥ ७५ ॥
तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज । सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें ॥ ७६ ॥
आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे । नातरी अंवसे । चंद्र गूढु ॥ ७७ ॥
नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं । कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा ॥ ७८ ॥
किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी । तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे ॥ ७९ ॥
जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु । मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी ॥ ८० ॥
तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे । तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा ॥ ८१ ॥
नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं । सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥
आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशियां चिन्हीं जाणिजे । बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों ॥ ८३ ॥
तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें । विभांडूनि येती पाळे । विषयांचे ॥ ८४ ॥
तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणों लागे जीवा । तेथ दोहींसी बरवा । पाडु जे धरी ॥ ८५ ॥
हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष । कां हें मैळ हें चोख । ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥
जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे । जिया दिठी पारखिजे । विषो जीवें ॥ ८७ ॥
जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी । जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे ॥ ८८ ॥
अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण । आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची ॥ ८९ ॥
पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती । तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा ॥ ९० ॥
आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें । ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली ॥ ९१ ॥
तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा । येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा ॥ ९२ ॥
तऱ्ही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं । कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया ॥ ९३ ॥
नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी । उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या ॥ ९४ ॥
कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु । कां वस्त्रपणे तंतु- । दशे राहे ॥ ९५ ॥
तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम । लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे ॥ ९६ ॥
अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें । आतां आइकें आघवें । इंद्रियभेद ॥ ९७ ॥
तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन । इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें ॥ ९८ ॥
इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखांची उखिविखी । बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं ॥ ९९ ॥
मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार । पायु हे प्रकार । पांच आणिक ॥ १०० ॥
कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती । आइकें कैवल्यपती । सांगतसे ॥ १०१ ॥
पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं । तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं ॥ १०२ ॥
एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे । परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें ॥ १०३ ॥
जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं । रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे ॥ १०४ ॥
नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी । तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ॥ १०५ ॥
आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें ॥ १०६ ॥
मग तिहीं दाहे भागीं । देहधर्माच्या खैवंगीं । अधिष्ठिलें आंगीं । आपुलाल्या ॥ १०७ ॥
तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ । म्हणौनि रजाचें बळ । धरिलें तेणें ॥ १०८ ॥
तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी । ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें ॥ १०९ ॥
वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव । जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ॥ ११० ॥
जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ । जें अखंड सूये छळ । अहंकारासी ॥ १११ ॥
जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी । जें पाठी पुरवी । भयासि गा ॥ ११२ ॥
द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी । जें इंद्रियांतें लोटी । विषयांमजी ॥ ११३ ॥
संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी । मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची ॥ ११४ ॥
जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर । बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें ॥ ११५ ॥
तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन । आतां विषयाभिधान । भेदू आइकें ॥ ११६ ॥
तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु । हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥
इहीं पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी । जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु ॥ ११८ ॥
मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु । संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा ॥ ११९ ॥
हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच । जे बांधोनियां माच । क्रिया धांवे ॥ १२० ॥
ऐसे हे दाही । विषय गा इये देहीं । आतां इच्छा तेही । सांगिजैल ॥ १२१ ॥
तरि भूतलें आठवे । कां बोलें कान झांकवे । ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती ॥ १२२ ॥
इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच जे गा उठी । कामाची बाहुटी । धरूनियां ॥ १२३ ॥
जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें । न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती ॥ १२४ ॥
जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी । विषयां जिया गोडी । ते गा इच्छा ॥ १२५ ॥
आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे । तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु ॥ १२६ ॥
आतां यावरी सुख । तें एवंविध देख । जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु ॥ १२७ ॥
मना वाचे काये । जें आपुली आण वाये । देहस्मृतीची त्राये । मोडित जें ये ॥ १२८ ॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु ॥ १२९ ॥
कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांतीं । थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा ॥ १३० ॥
किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे । तेथ जें होये । तया नाम सुख ॥ १३१ ॥
आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था । जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे ॥ १३२ ॥
तें मनोरथसंगें नव्हे । एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे । हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी ॥ १३३ ॥
आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता । तिये नाम पंडुसुता । चेतना येथें ॥ १३४ ॥
जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं । जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना ॥ १३५ ॥
मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं । प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे ॥ १३६ ॥
जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी । ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं ॥ १३७ ॥
पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे । कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती ॥ १३८ ॥
नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन । कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा ॥ १३९ ॥
अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण । करी निरीक्षण । कूर्मी जेवीं ॥ १४० ॥
पार्था तियापरी । आत्मसंगती इये शरीरीं । सजीवत्वाचा करी । उपेगु जडा ॥ ४१ ॥
मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना । आतां धृतिविवंचना । भेदु आइक ॥ १४२ ॥
तरी भूतां परस्परें । उघड जाति स्वभाववैरें । नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ? ॥ १४३ ॥
नीरातें आटी तेज । तेजा वायूसि झुंज । आणि गगन तंव सहज । वायू भक्षी ॥ १४४ ॥
तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे । आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें ॥ १४५ ॥
ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें । कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती ॥ १४६ ॥
द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं । एकेकातें पोखी । निजगुणें गा ॥ १४७ ॥
ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें । तयां नांव म्हणें । धृती मी गा ॥ १४८ ॥
आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा । तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा ॥ १४९ ॥
एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद । यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥
रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥ १५१ ॥
करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥ १५२ ॥
कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥ १५३ ॥
कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥ १५४ ॥
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥
आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके । म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥
आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परी असो हें अनंतें । नामें यया ॥ १५७ ॥
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥
परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं ।तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें ॥ १५९ ॥
हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना ।प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥ १६० ॥
क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार ।म्हणौनि आतां उदार । ज्ञान आइकें ॥ १६१ ॥
जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥ १६२ ॥
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगा{ऐ}सें दुवाड । हेळसिती ॥ १६३ ॥
तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥ १६४ ॥
नाना भजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं । एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥
ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥ १६६ ॥
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा । जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥ १६७ ॥
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी । जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥ १६८ ॥
जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥ १६९ ॥
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये । जया ज्ञानाची सोये । ऐसें करी ॥ १७० ॥
मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरों ॥ १७१ ॥
जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । जयाचेनि विंदाणें । जग हें चेष्टें ॥ १७३ ॥
जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥ १७४ ॥
ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळलें मन । चोख कीजे ॥ १७५ ॥
आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥ १७६ ॥
तें अनिरूप्य कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥ १७७ ॥
मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी । तैं इंद्रियांचिया व्यापारीं । डोळांहि दिसे ॥ १७८ ॥
पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं । तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥ १८० ॥
कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥ १८१ ॥
अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्तिइ । कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष ॥ १८२ ॥
नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला । कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके ॥ १८३ ॥
तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगों आतां अवधानें । चागें आइक ॥ १८४ ॥

Very nice & useful
ReplyDeleteJay Jay ram krishna hari... Khup chan vatla... Ajpasun purnach ovya vachnar asa mi Sankalp gheto...
ReplyDelete