१६ जून २०१९ निरुपण
अध्याय ९ : राजविद्याराजगुह्ययोगः (गीता श्लोक ३१-३२ / ज्ञानेश्वरी ओव्या ४२५-४७४)

निरुपण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति । कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१॥
तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसा हन भाव तुज जाईल । हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ? ॥ ४२५ ॥
पैं सूर्यु जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे । तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहें ? ॥ ४२६ ॥
म्हणौनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पंडुसुता । तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरूप माझें ॥ ४२७ ॥
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती । किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥ ४२९ ॥
एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती । जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥ ४३० ॥
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वहावा ? ॥ ४३१ ॥
कां रूपवयसा माजा । आथिलेपणें कां गाजा ? । एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥
कणेंविण सोपटें । कणसें लागलीं घनदाटें । काय करावें गोमटें । वोस नगर ? ॥ ४३३ ॥
नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें । कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥ ४३४ ॥
तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळ जाति गौरव । जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥
तैसें माझिये भक्तीविण । जळो तें जियालेंपण । अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काईं ? ॥ ४३६ ॥
पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली । तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥ ४३७ ॥
निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला । तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥
कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां ठेविले । ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥ ४३९ ॥
तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे । संसारदुःखासि भाणें । वोगरिलें ॥ ४४० ॥
म्हणौनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजहि व्हावें । वरि देहाचेनि नांवें । पशूचेंहि लाभो ॥ ४४१ ॥
पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें । कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पावलिया मातें ॥ ४४२ ॥

मां हि पार्थ व्यपाश्रित्य येपिस्युः पापयोनयः | स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्ते~पि यान्ति परां गतिम् ॥ ३२॥
अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं । तिये पापयोनींही किरीटी । जन्मले जे ॥ ४४३ ॥
ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड । परि माझ्यां ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४४ ॥
जयांचिये वाचें माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रूप । जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४४५ ॥
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण । जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥ ४६ ॥
जयांचे ज्ञान विषो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे । जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्हवीं मरण ॥ ४४७ ॥
ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥ ४४८ ॥
ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां । परि मजसीं तुकितां तुकां । तुटी नाहीं ॥ ४४९ ॥
पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें । माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमें ॥ ४५० ॥
तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें संकटे सदा किरीटी । कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥
एर्हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें । म्हणौनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती । तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ४५३ ॥
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे । तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥
तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे । जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥
म्हणौनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण । एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥
तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें । आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ४५७ ॥
जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ । मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ ४५८ ॥
कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे । जंव न घापती एकवटे । अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया । जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनलें ।जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥
तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे । जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥
हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझे ठायीं प्रवेशे । येतुलें हो मग आपैसें । मीचि होणें असे ॥ ४६३ ॥
अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचे आंगीं । कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥
पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हती ? ॥ ६५ ॥
नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें ? । कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥
अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां । कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ ४६७ ॥
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा । यां भक्तीं मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥
तैसाचि गोपीकांसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें । येरां घातकां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों पां भलतेनि मार्गें । भक्ती कां विषयविरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥
म्हणौनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं । उपायांची नाहीं । वाणी एथ ॥ ४७१ ॥
आणि भलतिया जातीं जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें । परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥
अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्ही जाहालें । तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥ ४७३ ॥
यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना । मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥

audio is different. Can you please upload the vivechan audio for these ovya?
ReplyDelete